मुंबई, 7 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाची हक्काची जागा राखण्यात अपयश आले आहे. मंगळवारी मुंबईत बोलताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केले. ही जागा पदरात पाडून घेण्यात आपण कमी पडलो असून, हे आपले सामूहिक अपयश मानले पाहिजे अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली.
यापूर्वी याच मतदारसंघातून अरुण लाड हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यामुळे या जागेसाठी पक्षाचा मोठा आग्रह होता. मात्र, ही जागा हातून गेल्याने राष्ट्रवादीची ‘बार्गेनिंग पॉवर’ कमी झाली, असा अर्थ काढणे चुकीचे ठरेल, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.
तटकरे यांनी सांगितले की, महायुतीतील जागावाटपाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पातळीवर घेण्यात आला. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्याने त्यांनी एकट्यानेच या चर्चा केल्या, यातून कोणताही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरी ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची संधी आहे. त्यामुळे वाटाघाटींसाठी अजूनही वेळ असल्याचे तटकरे म्हणाले. ही निवडणूक महायुती म्हणूनच लढली जावी, यासाठी चर्चा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पक्षांतर्गत चर्चा करून आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वाचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मी नाही सांगणार…’ जया बच्चन यांनी पत्रकाराचा माईक ढकलला; कंगना रनौतने व्हिडीओ शेअर करत लगावला सणसणीत टोला
- ‘वयाच्या ६० नंतर पुढाऱ्यांनी थांबायला हवं, कारण…’ इंदुरीकर महाराजांचं राजकारण्यांवर थेट भाष्य
- ‘अभिनयातला ‘अ’ येत नसला तरी…’; सई ताम्हणकरसाठी अभिनेत्री आरती सोलंकीची पोस्ट
Quick Answers
पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा पदरात पाडून घेण्यात पक्ष कमी पडला असून, हे आपले सामूहिक अपयश मानले पाहिजे, अशी स्पष्ट कबुली सुनील तटकरे यांनी दिली.
यापूर्वी याच मतदारसंघातून अरुण लाड हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले होते.
जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या पातळीवर घेण्यात आला.
अर्ज मागे घेण्याची संधी ९ ऑक्टोबरपर्यंत असून वाटाघाटींसाठी अजूनही वेळ असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









