Share

माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल काढणार स्वतःचा पक्ष? मिर्झापूर किंवा बलियातून लढण्याची शक्यता

माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजकारणात प्रवेश निश्चित झाला असून, त्या नव्या पक्षाची स्थापना करून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Published On: 

Divya Mittal to contest UP elections

प्रतिनिधी, 6 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे. त्या कोणत्याही विद्यमान पक्षात सामील न होता स्वतःचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिव्या मित्तल यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत अद्याप अधिकृत भाष्य केलेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, त्या मिर्झापूर किंवा बलिया मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या राजकीय प्रवेशामुळे यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसमोर नवे आव्हान उभे राहण्याची चर्चा सुरू आहे.

याच निवडणुकीच्या निमित्ताने आणखी एका नावाची चर्चा सुरू आहे. खासदार चंद्रशेखर यांच्यावर अनेक आरोप करणाऱ्या रोहिणी घावरी यादेखील यंदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेचे एकूण ४०३ मतदारसंघ आहेत. प्राप्त माहितीनुसार ही निवडणूक २०२७ मध्ये होणार असली तरी, निवडणूक आयोगाने अद्याप तारखांची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सूत्रांच्या माहितीनुसार, दिव्या मित्तल कोणत्याही विद्यमान पक्षात सामील न होता स्वतःचा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. तसेच त्या मिर्झापूर किंवा बलिया मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही