Share

बुलडाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा; कव्वालीच्या कार्यक्रमात नगरसेवकासह दोघांची हत्या

बुलडाण्यातील देऊळगाव राजा येथे आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत एका नगरसेवकासह दोघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Published On: 

Buldhana clash between Shiv Sena and NCP two killed

बुलडाणा, 6 ऑक्टोबर: बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रात्रीच्या सुमारास एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान हा वाद उफाळून आला. या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

देऊळगाव राजा परिसरात आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमात दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या मारामारीत प्राण गमावलेल्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अनवर शेख आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आरिफ शेख यांचा समावेश आहे.

या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या दोघांपैकी एका नगरसेवकाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान ही तुंबळ हाणामारी झाली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही