Share

पोलिसांची धडक कारवाई: वाळू व मुरुमाची अवैध वाहतूक करणारी ३ वाहने जप्त; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बिडकीन पोलिसांनी सलग दोन दिवस धडक कारवाई करत वाळू आणि मुरुमाची अवैध वाहतूक करणारी तीन वाहने व ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Published On: 

Bidkin Police seize heavy vehicles in illegal sand smuggling.

बिडकीन | किरण काळे पाटील: हद्दीत विनापरवाना अवैध वाळू आणि मुरुमाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर (Sand Smuggling) बिडकीन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सलग दोन दिवस करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एक टिप्पर आणि दोन हायवा अशी तीन वाहने पकडण्यात आली आहेत. या धडक मोहिमेत एकूण १२ ब्रास गौण खनिज (वाळू व मुरुम) आणि वाहनांसह तब्बल ३७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन चालकांसह अज्ञात मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली मोठी कारवाई २८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चितेगाव-बाभूळगाव परिसरात करण्यात आली. सपोनि शेळके यांच्या सूचनेनुसार पोलीस हवालदार अमोल मगर आणि पो.अं. ढवळे हे गस्तीवर असताना, त्यांना बाभूळगाव येथून दोन हायवा वाहने मुरुम घेऊन सह्याद्री पार्ककडे येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पंचांसह बाभूळगाव येथे सापळा रचला. पहाटे २:५५ वाजेच्या सुमारास एम.एच. २० डी.ई. ४१७९ आणि एम.एच. १४ एम.टी. ७०६९ क्रमांकाचे दोन टाटा हायवा येताना दिसले. पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता त्यात १० ब्रास मुरुम आढळून आला. या वाहनांचे चालक अरुण कृष्णा राठोड (वय २९, रा. जांभळीवाडी, ता. पैठण) आणि किरण शिवाजी पवार (वय २४, रा. गेवराई तांडा, ता. पैठण) यांच्याकडे रॉयल्टी नसल्याचे उघड झाले. या कारवाईत दोन हायवा आणि २० हजार रुपयांचा मुरुम असा एकूण ३० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई याच्या आदल्या दिवशी, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी शेकटा शिवार भागात झाली. शेंदूरवादा येथून शेकटाकडे एक विनानंबरचे पिवळ्या रंगाचे टिप्पर (एम.एच. २० जी.झेड. ८१२२) वाळू घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अंमलदार सचिन आगलावे आणि पो.हे.कॉ. राजू चव्हाण यांनी खंडोबा मंदिराजवळ सापळा रचून हे वाहन पकडले. तपासणीत वाहनात २ ब्रास वाळू आढळली. चालक कार्तिक सोमिनाथ नवले (वय २३, रा. लांझी, ता. गंगापूर) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. या कारवाईत ७ लाख रुपयांचे वाहन आणि १० हजार रुपयांची वाळू असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळू आणि मुरुमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी, दोन्ही घटनांमध्ये बिडकीन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) सह गौण खनिज अधिनियम २१ (१), (२), (३), (४), (५) अन्वये तीनही चालक आणि वाहनांच्या अज्ञात मालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

या कारवाईत १२ ब्रास गौण खनिजासह (वाळू व मुरुम) आणि वाहनांसह एकूण ३७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही