प्रतिनिधी, 4 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. ‘मला आता भारतात शांतता जाणवत नाही,’ असे मोठे विधान त्याने केले असून, सोशल मीडियावर त्याच्यावर तीव्र शब्दांत टीका होऊ लागली आहे.
शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाईट’ या कार्यक्रमाच्या गांधी जयंती विशेष भागामध्ये संजय दत्त सहभागी झाला होता. यावेळी तो त्याच्या प्रसिद्ध ‘मुन्नाभाई’च्या लूकमध्ये पोहोचला होता. याच कार्यक्रमादरम्यान त्याने देशातील शांततेवर भाष्य केले.
Sanjay Dutt shocking statement about India
या शोमध्ये संजय दत्तने पाच मिनिटांसाठी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे म्हटले. यावेळी त्याने नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील व्यंग्यात्मक भाषण केले. या शोचा प्रोमो व्हायरल होत असून यात टॅरिफवरूनही मजाक उडवण्यात आला आहे, तसेच वारंवार गांधीगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे.
मॉक PM स्पीच सुरू होण्यापूर्वी भारताबद्दल बोलताना संजय दत्त म्हणाला, “या देशात खूप चांगले लोक आहेत. पण येथे शांती हवी आहे. आता मला आमच्या देशात ती शांती जाणवत नाही. आम्ही भारतीय मोठ्या मनाचे आहोत आणि पाहुण्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत करतो. आम्ही खूप काही दिले आहे. आम्हाला कायमच असे राहायचे आहे. मी प्रार्थना करतो की, हे दिवस आमच्या देशात लवकरत परत येतील.”
त्याच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले असून, भारतात शांतता का दिसत नाही? भारतात काय अशांत आहे? असे म्हणत लोक त्याला खडेबोल सुनावत आहेत. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा पूर्ण केलेला संजय दत्त चित्रपटांमध्ये सक्रिय असून त्याचे कुटुंबिय दुबईत स्थायिक आहे. मात्र, त्याच्या या नव्या विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- नागपूर पदवीधरमधून नितेश कराळे मास्तर अपक्ष लढणार; ५ ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज
- शरद पवारांनी विधानपरिषदेच्या ७ जागा दिल्या, महायुतीने एकही नाही; रामदास आठवलेंची सत्तेत वाटा देण्याची मागणी
- ‘मी त्यांच्यासमोर एकदम शांत असते…’; पूजा बिरारीने सांगितला सासू सुचित्रा बांदेकरांसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा
Quick Answers
संजय दत्तने ‘मला आता भारतात शांतता जाणवत नाही’ असे विधान केल्यामुळे तो चर्चेत आला असून सोशल मीडियावर त्याच्यावर तीव्र टीका होत आहे.
संजय दत्त शेखर सुमन यांच्या ‘शेखर टुनाईट’ या कार्यक्रमाच्या गांधी जयंती विशेष भागामध्ये त्याच्या प्रसिद्ध ‘मुन्नाभाई’च्या लूकमध्ये सहभागी झाला होता.
या शोमध्ये संजय दत्तने पाच मिनिटांसाठी स्वतःला पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे म्हटले आणि नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संवादावर आधारित व्यंग्यात्मक भाषण केले.
संजय दत्तचे कुटुंब दुबईत स्थायिक आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









