Share

दस्त नोंदणीसाठी आता आधार कार्ड अनिवार्य; फसवणूक टाळण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचा सर्वात मोठा निर्णय!

राज्यात खरेदी, विक्री, बक्षीस पत्रासह ६३ प्रकारच्या दस्त नोंदणीसाठी १ ऑक्टोबरपासून आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. मालमत्ता फसवणूक रोखण्यासाठी शासनाचे मोठे पाऊल.

Published On: 

Aadhaar Card mandatory for property and document registration in Maharashtra 2026

प्रतिनिधी, 1 ऑक्टोबर : मालमत्ता खरेदी किंवा जमिनीचा व्यवहार करताना खोटे साक्षीदार उभे करून फसवणूक झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. पण आता या सर्व प्रकारांना कायमचा आळा बसणार आहे. होय, कारण राज्य शासनाने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.

नुकत्याच जारी झालेल्या राजपत्रानुसार, आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून राज्यात दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य (Aadhaar Card Mandatory) करण्यात आलं आहे. थोडक्यात सांगायचं तर, तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल, तर जमिनीचा किंवा मालमत्तेचा कोणताही व्यवहार आता पूर्ण होऊ शकणार नाही.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्याच्या महसूल विभागात गेल्या दोन वर्षांत अनेक धडक निर्णय घेतले आहेत. त्यात आता या नव्या निर्णयाची भर पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सूचनेनुसार हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे खरेदी, विक्री, बक्षीस पत्र, गहाणखत आणि वाटणीसह जवळपास ६३ प्रकारच्या दस्त नोंदींसाठी आता केवळ आधार कार्डच (Aadhaar Card) ओळखीचा मुख्य पुरावा मानला जाणार आहे. यासंदर्भातील अधिकृत राजपत्र शासनाने प्रकाशित केलं असून, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.

Property Registration Aadhaar Card Mandatory

अनेकदा दस्त नोंदणी कार्यालयात खोटे पक्षकार आणि बोगस साक्षीदार उभे करून जमिनी लाटण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशा घटनांमधून सर्वसामान्यांची आयुष्यभराची कमाई धोक्यात येते. त्यामुळेच, ही फसवणूक मुळासकट उखडून टाकण्यासाठी दस्त नोंदणी प्रक्रियेत आधार कार्डाची सक्ती करण्यात आली आहे. आता आधारच्या पडताळणीशिवाय कोणतीच दस्त नोंदणी होणार नाही, हे स्पष्ट झालंय.

दुसरीकडे, या नव्या नियमामुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्यास मदत मिळेल. ज्या पक्षकारांकडे दस्त नोंदणीच्या वेळी आधार कार्ड नसेल, त्यांच्या दस्ताची नोंदणी थेट नाकारण्यात येईल.

त्यामुळे तुम्हीही जर एखादी मालमत्ता खरेदी किंवा विक्रीचा विचार करत असाल, तर तुमचं आधार अपडेटेड असणं आता अत्यंत गरजेचं आहे. शासनाच्या या एका निर्णयामुळे जमीन माफिया आणि बोगस व्यवहार करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

नुकत्याच जारी झालेल्या राजपत्रानुसार, राज्यात १ ऑक्टोबरपासून दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही