Share

“ते व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय”; ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावरून फडणवीसांचा हल्लाबोल

पराभवानंतर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर खापर फोडणाऱ्या विरोधकांवर देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली असून त्यांचा मेंदू चोरीला गेल्याचा टोला लगावला आहे.

Published On: 

Devendra Fadnavis criticizing opposition over EVM and Election Commission

नागपूर, 27 सप्टेंबर: निवडणुकीतील पराभवानंतर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर खापर फोडणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडकून टीका केली आहे. “हे व्होट चोरी म्हणतात, पण यांचा मेंदूच चोरीला गेलेला आहे. मी माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करतो की, यांचा चोरीला गेलेला किंवा गहाण ठेवलेला मेंदू परत आणून देईल अशी एखादी तपास समिती किंवा व्यवस्था तयार करता येईल का? अशी माझी मागणी आहे,” असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला.

राहुल गांधी सातत्याने संवैधानिक संस्थांना बदनाम करून संविधानावर प्रश्नचिन्ह उभे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींची संपूर्ण मानसिकता कम्युनिस्ट आणि अतिडावी झाली असून, त्यांना भारतात अतिडावी राजवट आणायची आहे, असे फडणवीस म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत व्यक्त केलेली शंका आणि अराजकता राहुल गांधी स्पष्टपणे करताना दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निवडणूक आयोगातील मतभेदांबाबत नुकत्याच एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीचा त्यांनी इन्कार केला. एसआयआर (SIR) प्रक्रियेत तिन्ही आयुक्तांमध्ये एकमत असून कोणतेही मतांतर नाही. कॅबिनेट सेक्रेटरींना पाठवलेले पत्र हे धोरणात्मक नसून केवळ डेपुटेशनवर झालेल्या नियुक्तीबाबत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवलेल्या फॉरमॅटमध्येच फॉर्म नंबर ६ असताना त्याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले.

तेलंगण, पंजाब, हिमाचल किंवा कर्नाटकात जिंकल्यावर निवडणूक आयोग चांगला असतो, पण भाजप जिंकताच आयोगाला दोष दिला जातो, अशी टीका त्यांनी केली. पश्चिम बंगालमधील १५ मतदारसंघांत एसआयआरमध्ये मतदार कमी होऊनही तिथे टीएमसी कशी निवडून आली? असा सवाल करत मतदार याद्यांमधील प्रश्न शहरांमधील मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही त्यांनी माहिती दिली. राज्यात २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून, १२ तातडीच्या उपायांना मान्यता दिली आहे. या तालुक्यांमध्ये सरसकट मदत दिली जाणार असून, आवश्यक तिथे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

विरोधक व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेला आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच विरोधकांचा चोरीला गेलेला किंवा गहाण ठेवलेला मेंदू परत आणून देईल अशी तपास समिती किंवा व्यवस्था तयार करता येईल का, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही