Share

‘दिग्दर्शक कवडे असं का म्हणाले माहिती नाही, पण नक्कीच उत्तर देईन’; मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचे स्पष्टीकरण

दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ‘सराईत खोटारडा’ आणि ‘अनप्रोफेशनल’ म्हटल्यानंतर अभिनेता ओंकार भोजनेने आपली बाजू मांडली असून, आपण टीमच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे.

Published On: 

Onkar Bhojane on Milind Kavde Afratafri allegations

मुंबई: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) सध्या आगामी ‘अफरातफरी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ओंकारवर ‘अनप्रोफेशनल’ असल्याचा आरोप केल्यानंतर आता ओंकारने मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘अफरातफरी’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी ओंकारवर गंभीर आरोप केले होते. “ओंकार खूप अनप्रोफेशनल अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून तो उत्तम असला, तरी माणूस म्हणून तो सराईत खोटारडा आहे,” अशी बोचरी टीका कवडे यांनी केली होती.

ऑक्टोबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जूनमध्येच सांगूनही ओंकार वेळ देत नसल्याचे कवडे म्हणाले होते. तो कोणाचेही फोन उचलत नाही आणि गेल्या चार महिन्यांपासून केवळ ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो’ असा टेम्प्लेट मेसेज पाठवत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

या सर्व आरोपांना उत्तर देताना ओंकार म्हणाला, “मी यापुढे सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. मी त्यांच्या टीम आणि ईपींसोबत संपर्कात आहे. दिग्दर्शक असे का म्हणाले, हे मला माहिती नाही, पण यावर नक्कीच उत्तर देईन,” असे ओंकार म्हणाला. ओंकारच्या या प्रतिक्रियेनंतर आता हा वाद शांत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मिलिंद कवडे यांनी ओंकार भोजनेवर 'अनप्रोफेशनल' असल्याचा आणि माणूस म्हणून तो 'सराईत खोटारडा' असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ओंकार फोन उचलत नाही आणि चार महिन्यांपासून केवळ 'दादा मी तुला कॉलबॅक करतो' असा टेम्प्लेट मेसेज पाठवतो, असा दावा त्यांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही