मुंबई– राज्यात अखेर कोरडा दुष्काळ (Drought Relief) जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या आणि पिके जळाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यामध्ये कमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह स्थानिक आमदार व खासदारांनी आपापल्या भागातील पीक परिस्थितीची पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आल्यानंतर ही अधिसूचना काढण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
“२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्याची अधिसूचना काढण्यात आल्यानंतर आता दुष्काळाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवल्या जातील. हे एक नैसर्गिक संकट असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, या प्रश्नावर बोलताना कृषीमंत्री भरणे म्हणाले की, “दुष्काळ जाहीर झाल्याने आता आपोआपच सर्व सवलती शेतकऱ्यांना मिळतील. तसेच येणाऱ्या कालावधीत लवकरच शेतकऱ्यांना अधिकच्या सवलतीही दिल्या जातील.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधू एकत्र; ४ ऑक्टोबरला मुंबईत भव्य जनमोर्चाची हाक
- राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी विविध सवलतींचा शासन निर्णय जारी
Quick Answers
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचा शासन निर्णय २६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पीक परिस्थितीची पाहणी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर ही अधिसूचना काढण्यात आली, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.








