Share

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी विविध सवलतींचा शासन निर्णय जारी

राज्यातील २६५ तालुक्यांत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून, शेतकऱ्यांसाठी कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिलात सूट आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफीची घोषणा केली आहे.

Published On: 

Maharashtra drought relief government decision farmer help

Maharashtra Drought: राज्यातील मोठ्या प्रमाणावरील पीकहानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले असून, याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात एकूण ३८७ तालुके असून, त्यापैकी २६५ तालुक्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. राज्याचा सुमारे ७५ टक्के भाग दुष्काळाच्या छायेत असल्याने शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न येण्याची परिस्थिती राहिलेली नाही. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून विविध सवलती लागू केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट देण्यात आली असून, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कामांच्या निकषांत शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू केली जाणार आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक तेथे टँकर्सचा वापर, जनावरांसाठी चारा आणि जलसंधारणाची कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. शेतीवर आश्रित शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था उभारण्याचे नियोजन या शासन निर्णयात करण्यात आले आहे.

विभागअ.क्र.जिल्हातालुके नावेतालुक्यांची संख्या
कोकण१ठाणेनिरंक०
२पालघरनिरंक०
३रायगडश्रीवर्धन१
४रत्नागिरीरत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर३
५सिंधुदुर्गसावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला८
नाशिक६नाशिकमालेगाव, बागलाण, कळवण, चांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, यावला, देवळा१०
७धुळेधुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर४
८जळगावएरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल१५
९नंदुरबारअक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी६
१०अहिल्यानगरनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता१४
पुणे११पुणेभोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर८
१२सोलापूर [०.१.४]उ. सोलापूर, द. सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा११
१३सांगली [०.१.४]मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ४
१४सातारा [०.१.४]सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर६
१५कोल्हापूर [०.१.५]पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड६
छ. संभाजीनगर१६छ. संभाजीनगरछ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री९
१७जालनाबदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद८
१८बीडबीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी११
१९लातूरलातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट१०
२०धाराशिवधाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा८
२१नांदेडनांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, वायगाव१४
२२परभणीपूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी९
२३हिंगोलीहिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत५
अमरावती२४बुलढाणाजळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा१३
२५अमरावतीअमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर१४
२६अकोलाअकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, म़ूर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी७
२७वाशिम [०.१.६]वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा६
२८यवतमाळयवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव१६
नागपूर२९वर्धावर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी७
३०नागपूरनागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर१४
३१भंडाराभंडारा, पवनी, लाखांदूर३
३२गोंदियातिरोडा१
३३चंद्रपूरचंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा१२
३४गडचिरोलीगडचिरोली, चामोर्शी२
एकूणएकूण तालुके२६५

राज्यात ३८७ तालुके असून त्यापैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने महाराष्ट्रातील सुमारे ७५ टक्के भागात दुष्काळ जाहीर झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

राज्यात पीकहानीच्या परिस्थितीमुळे राज्य सरकारने एकूण ३८७ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही