Share

बँकांना ५ दिवसांचा आठवडा देण्यास सरकारचा नकार; बँक कर्मचाऱ्यांची २८ ते ३० सप्टेंबरला संपाची हाक

५ दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने नकार दिल्याने २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

Published On: 

Bank strike announced as 5 day banking rejected

Bank Strike: बँकांना आठवड्यातून पाच दिवस काम (5 Day Banking) लागू करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. बँकांसाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही आणि सरकारकडून असा कोणताही शब्द देण्यात आला नव्हता, असे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन’चे (AIBOC) सरचिटणीस रूपम रॉय यांच्या दाव्यानुसार, मार्च २०२४ मध्ये ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ आणि बँक युनियन्स यांच्यात झालेल्या १२ व्या द्विपक्षीय वेतन करारात ५ दिवसांच्या आठवड्यावर सहमती झाली होती. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हा विषय कराराच्या चर्चेत कधी नव्हताच आणि यावर कोणतीही अंतिम सहमती झालेली नव्हती, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

पाच दिवसांची बँकिंग लागू केल्यास देशातील छोटे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य बँक ग्राहकांच्या सेवांवर विपरीत परिणाम होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. मागणी फेटाळल्यामुळे ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या (UFBU) नेतृत्वाखाली २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत सरकारी बँकांमध्ये संप पुकारण्यात आला आहे.

या संपकाळात बँक शाखांमधील चेक क्लिअरन्स, कॅश भरणे आणि काढणे यांसारखे काउंटरचे काम प्रभावित होईल. मात्र, यूपीआय (UPI), नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरळीत सुरू राहतील. संपाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आरबीआयच्या सूचनेनुसार २७ सप्टेंबर रोजी (रविवारी) काही प्रमुख बँकांच्या शाखा चालू ठेवण्याचे नियोजन केले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Quick Answers

बँकांना आठवड्यातून पाच दिवस काम (5 Day Banking) लागू करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने नाकारल्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

तुमच्या प्रश्नाचे उत्तर आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास Web Search fallback वापरला जाऊ शकतो.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही