Share

दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करणार; लातूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये नुकसानीची पाहणी केली. येत्या दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Published On: 

Devendra Fadnavis on women reservation

लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. औसा मतदारसंघातील खरोसा शिवारात त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एका भावूक झालेल्या शेतकऱ्याला मिठी मारून त्यांनी धीर दिला.

लातूर जिल्ह्यात यंदा केवळ ५० टक्के पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची दखल घेत, १९७२ नंतरचा हा सर्वात मोठा दुष्काळ असल्याचे सांगत फडणवीस यांनी येत्या दोन दिवसांत राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली. तसेच, शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. “कायदा म्हणून पंचनामा करतोय, पण मदत सरसकट करू. या संकटात तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असा दिलासा त्यांनी (Devendra Fadnavis) दिला.

आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा आणि इतर सहा गावांतील पाणीपुरवठा योजना वीज बिलाच्या थकबाकीमुळे बंद असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर, शासनाकडून थकीत बिलाचा भरणा करून ही योजना तातडीने सुरू केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही