Bharat Gogawale: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि जात पडताळणीच्या मागणीसाठी पुकारलेले उपोषण सरकारच्या विनंतीनंतर मागे घेतले आहे. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर काही गंभीर आरोप होत आहेत. जरांगे पाटील यांनी ठराविक आणि जवळच्या व्यक्तींना जलसंपदा विभागाचे कंत्राट देण्यासाठी सरकारवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच दरम्यान जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली होती. एकनाथ शिंदे यांची शान गरीब मराठ्यांनी आणि आपल्या आंदोलनाने वाढवली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच, आंदोलनातील मराठ्यांना गुंतवण्याचे काम शिंदे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
जरांगे पाटील यांच्या या टीकेला राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “एकनाथ शिंदे यांची शान लाखो लाडक्या बहिणी, मराठे आणि शेतकरी यांच्यासाठी केलेल्या कामामुळे वाढली आहे. कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊ नये आणि ठाण्याला कोणी आव्हान देऊ नये,” असा थेट इशारा गोगावले यांनी दिला. तसेच, मराठे म्हणून याचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत मराठ्यांनीच मदत केल्याचे सांगत सरकारने फसवणूक केल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. तसेच, कॅबिनेटमधील एका मंत्र्याने आपले ऐकू नये असे म्हटल्याचा दाखला देत जरांगे यांनी नाव न घेता शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता आणि आपल्यावर टीका करण्यासाठी ११ टीम नेमल्याचा दावाही केला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- TRAI चा मोबाईल ग्राहकांना दिलासा; इंटरनेट डेटाविना स्वस्त रिचार्ज प्लॅन देणे कंपन्यांना बंधनकारक
- मुख्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करा, SIR प्रक्रिया थांबवा; आयोगातील फुटीनंतर कपिल सिब्बल यांची मागणी
- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एकतर्फी निर्णयांवरून आयोगात फूट; दोन आयुक्तांची कॅबिनेट सचिवांकडे तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











