Share

शिवसेना कोणाची? सुनावणी पुढे ढकलली; मात्र सामंत, राठोड अन् भुसेंच्या सह्यांमुळे कोर्टात शिंदे गटाची कोंडी होणार: असीम सरोदे

सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीत तीन मंत्र्यांच्या सह्या आणि कागदपत्रे शिंदे गटासाठी मोठी कायदेशीर अडचण ठरणार असल्याचा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे.

Published On: 

Asim Sarode on Shiv sena Uddhav Thackeray

पुणे (Shiv sena)– शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या सुनावणीची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कायदेशीर लढाईकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच, वकील असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे गटाच्या कायदेशीर अडचणी वाढणार असल्याचा दावा केला आहे.

सुप्रीम कोर्टासमोर बाजू मांडताना शिंदे गटाला काही महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षफुटीच्या काळात काही ठरावांवर असलेल्या विद्यमान मंत्र्यांच्या सह्या शिंदे गटासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकतात.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी: तीन मंत्र्यांच्या सह्यांमुळे शिंदे गटाची कोंडी?

या कायदेशीर पेचाबाबत बोलताना सरोदे यांनी थेट कागदोपत्री पुराव्यांचा संदर्भ दिला. शिंदेंच्या गटाची मोठी अडचण होणार आहे. कारण असत्य सांगायला वेळ कितीही दिला तरी वेळ कमी पडतो. असत्य घोटून घोटून त्यांना सुप्रीम कोर्टासमोर मांडावं लागणार, त्यामुळे वेळ लागणार. एक मोठी अडचण आहे. त्याशिवाय दुसरी एक कागदपत्रांची अडचण आहे,” असे ते म्हणाले. जेव्हा काही आमदार पक्षातून बाहेर पडले होते, तेव्हा पळून न गेलेल्या उदय सामंत, संजय राठोड आणि दादा भुसे यांच्या सहीने एकनाथ शिंदे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते, याकडे सरोदे यांनी लक्ष वेधले.

या सह्यांबाबतचा पुरावा भक्कम असल्याचा दावा करत सरोदे पुढे म्हणाले, “उदय सामंत, संजय राठोड, दादा भुसे यांनीही कधीही सांगितलं नाही की ही आपली सही नाहीये. त्यामुळे हा कागदोपत्री सज्जड पुरावा आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एकनाथ शिंदे यांना निलंबित करताना एक सूचक आणि एक अनुमोदक म्हणून हेच लोक होते. आता ही गोष्ट अडचण ठरणार आहे.”

एकनाथ शिंदे स्वतः कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित होते आणि पक्ष घटनेत विस्तार करताना त्यावर त्यांचीही स्वाक्षरी असल्याचा युक्तिवाद सरोदे यांनी केला आहे. “शिंदेंची सही असलेले कागदपत्रं कोर्टासमोर मांडलेले आहेत. हे सर्व मग तुम्ही कसे नाकारणार आहात? हे सर्व कागदपत्र मुख्य निवडणूक आयोगाने बघितलेच नाहीत हाच मुख्य वाद आहे. उद्धव ठाकरेंकडून सांगितला जाणारा हा वाद खोटा आहे, असं सांगणं अडचणीचं होणार आहे, असेही सरोदे यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही