Share

लक्झरी बसवर FDA ची धाड; भेसळीच्या संशयावरून 16 लाखांचा खवा जप्त

धुळ्यात FDA आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत लक्झरी बसमधून वाहतूक होणारा तब्बल 16 लाखांचा खवा भेसळीच्या संशयावरून जप्त केला आहे.

Published On: 

Tukaram Mundhe warns adulterators | FDA Action

धुळे: अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि धुळे तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका लक्झरी बसमधून तब्बल 16 लाख 52 हजार 100 रुपये किमतीचा 5,385 किलो खवा (मावा) जप्त केला आहे. भेसळीच्या संशयावरून हा मोठा साठा जप्त करण्यात आला असून, त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सध्या जिल्ह्यात विविध वाहनांची धडक तपासणी सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत (FDA Action) अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या एका लक्झरी बसमधून (क्रमांक MP-44-ZF-7214) मिठाई निर्मितीसाठी लागणाऱ्या खव्याची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने मोराणे हद्दीत, साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ ही बस अडवून तपासणी केली.

धुळ्यात FDA ची मोठी कारवाई: 16 लाखांचा खवा कोल्ड स्टोरेजमध्ये

तपासणीदरम्यान या बसमध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात खवा आढळून आला. पुढील कारवाईसाठी हे वाहन टोल नाक्याजवळील ‘दिसान कोल्ड स्टोरेज’ येथे नेण्यात आले असून, हा साठा तिथे सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी या साठ्यातून विविध 13 प्रकारच्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत.

घेतलेल्या नमुन्यांमध्ये ब्रजनिधी, गणेशा, नंदि, खोडलं, श्री ग्वाल, श्री गोकुळ, गोपाल, कृष्णा आणि मीरा अशा विविध नावांच्या प्रीमियम आणि ट्रॅडिशनल हलवा तसेच डेझर्ट उत्पादनांचा समावेश आहे. हे सर्व नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, तिथून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही