Weather Forecast: पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले, तरी राज्याच्या अनेक भागांत अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरिपाची पिकं हातातून जाण्याची भीती आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यामुळे बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. अशातच आता राज्याच्या हवामान आणि कृषी क्षेत्रासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबत नवा आणि महत्त्वाचा अंदाज वर्तवला असून, लवकरच राज्याला मुसळधार पावसाची झोडपून काढण्याची शक्यता आहे.
सध्या पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता तशी कमीच आहे. मात्र, १४ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या काळात पावसाचा जोर अचानक वाढणार असून, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
Panjabrao Dakh weather forecast Maharashtra
पंजाबराव डख यांचा अंदाज: राज्यात कुठे पडणार मुसळधार पाऊस?
पंजाबराव डख यांनी ६ सप्टेंबर रोजी वर्तवलेल्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबरपासून पावसाला पुन्हा सुरुवात होईल. सुरुवातीच्या टप्प्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जालना आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील. त्यानंतर १४ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढेल आणि १६ ते २२ सप्टेंबरदरम्यान हा पाऊस राज्यभरात पसरेल.
दुसरीकडे, दक्षिण महाराष्ट्रासाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. १६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बारामती, फलटण, आटपाडी, पंढरपूर, सांगोला, जत आणि दौंड या पट्ट्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
या पावसामुळे केवळ पिकांनाच जीवदान मिळणार नाही, तर कोरडे पडलेले छोटे तलाव आणि बंधारेही भरण्याची शक्यता आहे. बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्येही चांगला पाऊस होईल. विशेषतः मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास पाण्याची आवक वाढेल. तसेच विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम आणि हिंगोलीतही पावसाची जोरदार हालचाल पाहायला मिळेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- Old Monk Ban in Maharashtra: ‘ओल्ड मॉन्क’वरील बंदी तूर्तास कायम? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- ‘डीजे-डॉल्बीवर बंदी आणताच येणार नाही’, साताऱ्याच्या एसपींचा मोठा गौप्यस्फोट; नेमकं कारण काय?
- धनंजय मुंडे यांचा जीममधला घाम आणि ‘ती’ पोस्ट; राजकारणात पुन्हा कमबॅकची जोरदार तयारी?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











