Share

साखरेचा गोडवा कडू! DMart, Blinkit वर खरेदीला मोठी मर्यादा, ग्राहकांना फटका

साखरेच्या वाढत्या किमती आणि तुटवड्यामुळे ब्लिंकिट, बिगबास्केट आणि डी-मार्ट सारख्या कंपन्यांनी साखर खरेदीवर मर्यादा घातल्या आहेत. सणासुदीत ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

Published On: 

Sugar Price Hike and purchase limit on quick commerce apps in India.

Sugar Price Hike: सणासुदीचे दिवस तोंडावर आहेत अशातच तुम्हाला हवी तेवढी साखर मिळाली नाही तर? जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या साखर उत्पादक देशातच आता साखरेची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.

बाजारात साखरेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने किमती तब्बल ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी इन्स्टामार्ट आणि डी-मार्ट सारख्या दिग्गज कंपन्यांनी साखर विक्रीवर मर्यादा आणल्या आहेत.

Sugar Price Hike: केवळ ५ किलो साखरेचीच मुभा

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, परिस्थिती चिंताजनक आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये ब्लिंकिटवरून ग्राहक ५ किलोची एकच पिशवी खरेदी करू शकतात. पुण्यातही नियम कडक आहेत. तिथे १ किलोच्या फक्त तीनच पिशव्या कार्टमध्ये ॲड करता येत आहेत.

बिगबास्केटनेही सावधगिरी बाळगली आहे. त्यांनी १ किलोच्या कमाल ५ पिशव्यांची मर्यादा घातली आहे. स्विगी इन्स्टामार्टवर काही ठिकाणी केवळ २ किलो साखर ऑर्डर करण्याची मुभा आहे. साखरेचा साठा पूर्णपणे संपू नये म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.

दुसरीकडे, साखरेचे दर भडकले असून किरकोळ बाजारात साखर ६४ रुपये किलोवर पोहोचली आहे. २५ ऑगस्टला देशात साखरेचा सरासरी दर ६३.९७ रुपये प्रति किलो होता. दरवाढीचा हा आकडा खरंच धक्कादायक आहे. गेल्या महिन्यात साखर ४८.८१ रुपये होती, म्हणजे महिनाभरात ३१ टक्क्यांनी किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दर चक्क ३८ टक्क्यांनी जास्त आहे.

सोमवारी साखरेचा कमाल दर ७६ रुपयांपर्यंत गेला होता. बहुतांश बाजारात साखर ६५ रुपये किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारातही दर ५९.२३ रुपयांवर पोहोचले आहेत.

सरकार आणि कारखानदारांच्या मते दर नियंत्रणात आहेत. पण प्रत्यक्षात किरकोळ बाजारात याचा कोणताही परिणाम दिसत नाहीये. त्यामुळे सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट मात्र पूर्णपणे कोलमडलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही