Share

गुणरत्न सदावर्तेंना भाजपचा दे धक्का! बाजूला सारत काढली स्वतःचीच नवी एसटी कामगार संघटना

गुणरत्न सदावर्तेंना बाजूला सारत भाजपने ‘एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य’ नावाने नवी संघटना स्थापन केली असून विजय मालोकार यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Published On: 

BJP launches new ST workers union sidelining Gunaratna Sadavarte in Maharashtra

Gunaratna Sadavarte: एसटी कामगारांच्या प्रश्नांवर राजकारण करणाऱ्या नेत्यांना भाजपने आता थेट आस्मान दाखवलंय का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण, आतापर्यंत एसटी कामगारांचा ‘मसिहा’ म्हणवून घेणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंना भाजपने मोठा धक्का दिलाय. भाजपने सदावर्तेंना बाजूला सारत थेट स्वतःचीच नवी एसटी कामगार संघटना मैदानात उतरवली आहे. त्यामुळे एसटीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अकोल्यात नुकतीच या नव्या संघटनेची अधिकृत घोषणा झाली. ‘एसटी कर्मचारी श्रमिक संघटना महाराष्ट्र राज्य’ असं या नव्या संघटनेचं नाव आहे. ही संघटना ‘श्रम भारतीय जनता कामगार महासंघा’शी संलग्न असणार आहे. विजय मालोकार यांची या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय. आज अकोल्यात या संघटनेची पहिलीच बैठक पार पडली. यावेळी भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि आमदार वसंत खंडेलवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भाजपची नवी खेळी आणि Gunaratna Sadavarte यांना शह

सदावर्तेंची ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ ही संघटना आतापर्यंत भाजपचीच मानली जायची. एसटी कामगारांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी सदावर्तेंनी मोठं रान उठवलं होतं. पण आता भाजपने त्यांना बाजूला ठेवत स्वतःची नवी चूल मांडली आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दुसरीकडे, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची ‘सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ’ ही संघटना आधीपासूनच राज्यात कार्यरत आहे.

एसटी महामंडळाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आमदार रणधीर सावरकर यांनी स्पष्ट केलंय. तर, कामगारांचे प्रश्न थेट शासनदरबारी मांडून ते सोडवणार असल्याचा दावा नवनियुक्त अध्यक्ष विजय मालोकार यांनी केलाय. पण या नव्या संघटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गटबाजी वाढणार की खरोखरच त्यांचे प्रश्न सुटणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही