Kriti Sanon: सणासुदीच्या दिवशी महिलांनी नेमके काय कपडे घालावेत, हे आता सोशल मीडियावरील ट्रोलर्स ठरवणार का? बॉलीवूड अभिनेत्री कृती सॅनन सध्या तिच्या एका जाहिरातीमुळे भयंकर ट्रोल होत आहे. रक्षाबंधनानिमित्त प्रदर्शित झालेल्या एका ज्वेलरी ब्रँडच्या (GIVA) जाहिरातीत तिने घातलेल्या कपड्यांवरून मोठा वाद निर्माण झाला. अगदी कंगना रनौतनेही या वादात उडी घेत कृतीच्या कपड्यांना ‘बिकिनी’ची उपमा दिली होती. पण आता कृतीने आपला मौन सोडत या सगळ्यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलंय.
Kriti Sanon Rakhi Ad Controversy
नेमकं प्रकरण काय?
या जाहिरातीत कृती तिच्या भावाला राखी बांधताना दिसते, आणि त्यानंतर ती एका कुत्र्यालाही राखी बांधते. यावेळी तिने परिधान केलेल्या इंडो-वेस्टर्न (ब्रॅलेट-स्टाईल ब्लाउज आणि स्कर्ट) कपड्यांवरून नेटकऱ्यांनी तिला टार्गेट केलं. कंगना रनौतनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या कपड्यांना जाणीवपूर्वक ‘क्रीपी’ (creepy) म्हटलं होतं.
पण आता कृतीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत या सगळ्याचा चांगलाच समाचार घेतलाय. “सणांचं महत्त्व तुम्ही घातलेल्या कपड्यांवरून ठरत नाही, तर त्यामागच्या भावना आणि परंपरेवरील तुमच्या श्रद्धेतून ठरतं,” असं कृतीने सांगितलं.
ती पुढे म्हणाली, “रक्षाबंधन हा संरक्षणाचा सण आहे. आम्ही बहिणी एकमेकींना राखी बांधतो. आमची प्रार्थना आणि वचन आमच्या लाडक्या कुत्र्यांसाठीही आहे. कारण, तेही आमचे कुटुंबच आहेत.”
महिलांच्या कपड्यांवरून होणाऱ्या सततच्या चर्चेवर तिने तीव्र संताप व्यक्त केला. “आपण महिलांना त्यांच्या कपड्यांवरून जज करणं कधी थांबवणार? फॅशन बदलत असली तरी आजही महिलांचा त्यांच्या संस्कृतीबद्दलचा आदर फक्त त्यांच्या कपड्यांवरूनच मोजला जातो. पण लक्षात ठेवा, संस्कृती आणि परंपरा तिच्या हृदयात असते, तिच्या ‘नेकलाईन’मध्ये नाही!” अशा शब्दांत तिने ट्रोलर्सची बोलती बंद केली.
दरम्यान, कृती सॅनन अलीकडेच ‘कॉकटेल २’ या चित्रपटात दिसली होती. १९ जून २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिच्यासोबत शाहीद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्याही मुख्य भूमिका होत्या. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालत आहे. कृतीच्या पुढच्या प्रोजेक्टची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- पुण्याचा शनिवारवाडा थेट संभाजीनगरमध्ये? काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टरवरून सोशल मीडियावर जोरदार खिल्ली
- काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ पोस्टरमध्ये मोठी गल्लत; छत्रपती संभाजीनगरला दाखवला चक्क ‘शनिवारवाडा’!
- ‘सरकारला झोपेतून जागं करावं लागेल’; स्मार्ट मीटरविरोधात रोहित पवारांचा एल्गार
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









