Share

‘पाणी अडवूया, पाणी जिरवूया’; जलसंधारण दिनानिमित्त एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन

२१ ऑगस्टच्या जलसंधारण दिनानिमित्त ‘वॉक फॉर वॉटर’ आणि ‘रिल चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले.

Published On: 

Eknath Shinde on Jalsandharan Din

मुंबई : माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल! या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ (Jalsandharan Din) करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे.

Eknath Shinde on Jalsandharan Din

यासोबतच जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘रिल चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून नावनोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

जलसंधारण आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन यांबाबत जनजगृती करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबवले जात आहेत. शिंदे यांनी नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आणि जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

“पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित व समृद्ध महाराष्ट्र घडवूया,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही