Share

‘प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेत तथ्य नाही’; सुनील तटकरेंची भूमिका स्पष्ट

सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीला दुजोरा देत राष्ट्रवादीतील नेतृत्वबदलाच्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

Published On: 

Sunil Tatkare on Prashant Kishor meeting

Sunil Tatkare : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यात सहा तास बैठक झाली. सध्याच्या वृत्तांनुसार, या बैठकीत किशोर यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची शिफारस केली.

सुनील तटकरे यांनी स्वतः या चर्चांवर भाष्य केले आहे. प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यातील बैठक झाल्याचे त्यांनी मान्य केले, तसेच प्रदेशाध्यक्षपदाबाबतच्या चर्चेवर आपली सविस्तर भूमिकाही मांडली.

पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले, “प्रशांत किशोर आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट झाली आहे. पण या बैठकीबाबत मला जास्त काही माहिती नाही. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय सल्लागार नेमल्याची मला अद्याप माहिती नाही. त्यामुळे मला याची माहिती नसल्याने त्यांची नियुक्ती झालीच नसेल असे मला वाटते.

Sunil Tatkare on Prashant Kishor meeting

त्यामुळे आता राज्यातील राष्ट्रवादीतील नेतृत्व बदल करण्याची चर्चा सुरु आहे, त्यात काही तथ्य नाही. सुनेत्रा वहिनी आणि आमचा कोअर ग्रुप आहे, पक्षातील निर्णय हे एकत्र बसूनच होतात. त्यामुळे मला वाटते आम्हाला कोणत्याही रणनितीकाराची गरज नाही.” असा मत तटकरे यांनी व्यक्त केले.

“नुकत्याच झालेल्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि इतर नियुक्त्यांच्यांबाबत आमची आधी चर्चा झालीच होती. त्यानुसार, सुनेत्रा वहिनींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीची पत्र दिली. पण ती माझ्या सहीनं दिलेली आहेत. त्यामुळं त्यात वावग वाटण्याचा कारणच काय? आता इतर पक्षातही अशा पद्धतीनं नियुक्त्या दिल्या जातात पण राष्ट्रवादीबाबतच असे प्रश्न का निर्माण होतात माहिती नाही.” अशी देखील खंत तटकरे यांनी बोलून दाखवली.

विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी असे वृत्त दिले होते की, प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शिफारस केली होती. यावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त केला आणि म्हटले, “तुमच्या सुत्रांपेक्षा माझं गोत्र मला माहिती आहे.”

“अख्खा महाराष्ट्र आठ वेळा पालथा घालणारे महाराष्ट्रातील जे कोणी मोजके लोक आहेत, त्यांपैकी मी एक आहे. त्यामुळे मला सलगपणाने सर्व मतदारसंघ, तालुके सांगता येऊ शकतात. कोणाला काय वाटतं? याचा विचार करण्याची आजची स्थिती नाही.” असेही तटकरे म्हणाले.

“मी ४१ वर्षे राजकारणात आहे. माझी सुरुवात १९८५ पासून काँग्रेसपासून झाली तेव्हाच मला तिकीट मिळाले. माझा ४१ वर्षाचा प्रवास असाच झालेला नाही. रायगड सारख्या सजग असलेल्या जिल्ह्यात मी आजवर काम केलेले आहे.” या शब्दांत तटकरे यांनी आपणच राज्याध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती का आहोत, याचे प्रभावीपणे संकेत दिले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही