Share

‘एक तरी बाहेरचा कंत्राटदार दाखवा’; गिरीश महाजनांचं राज ठाकरेंना थेट चॅलेंज

नाशिकच्या खड्डे आणि कंत्राटदारांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे व गिरीश महाजन आमनेसामने आले असून दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Published On: 

Girish Mahajan and Raj Thackeray 

नाशिक : नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली केली. गुजरातच्या कंत्राटदारांना कामे दिल्यामुळेच ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकाळात नाशिक (Nashik) शहर सुंदर होते, असा दावाही त्यांनी केला. मात्र आता त्या कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या आरोपांवर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) प्रत्युत्तर दिले आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, “तुम्ही नाशिक एवढं सुंदर केलं होतं तर मग तुमचा एक तरी नगरसेवक का निवडून आला नाही? सर्वच्या सर्व कसे पडले? अनाशिकच्या कंत्राटदारांची यादी पाठवतो. एक तरी बाहेरचा कंत्राटदार दाखवा.” असे आव्हानच गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना देल.

Girish Mahajan and Raj Thackeray 

गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. “नाशिककरांनी आपलं सरकार पाहिलं. तुमचे महापौर पाहिलं. तुमचा कार्यकाळ संपल्यावर एकही नगरसेवक निवडून दिला नाही. एवढं सुंदर नाशिक केलं होतं तर लोकांनी असा रिजल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे. त्याचं उत्तर द्या. नाशिकमध्ये काहीही केलं नाही. नुसत्या गप्पा केल्या. सुंदर हरीत काहीही केलं नाही. तुम्ही काय केलं हे दिसतं. लोकांना सर्वांना माहीत आहे.” असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

पुढे गिरीश महाजन म्हणाले, “नाशिक शहरातील मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटचे करणार आहोत. पुढचे ३०-४० वर्षे खड्डा पडणार नाही, याची काळजी घेऊ. रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे सुरू असल्याने त्रास होणार आहे हे आधीच सांगितलं होतं. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. गेल्या आठवड्यात मी तीन दिवस नाशिकमध्ये होतो. आढावा घेत होतो.”

राज ठाकरे यांनी गुजराती कंत्राटदारांना नाशिकची कामे दिल्याचा आरोप केला होता. यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरेंचा काही तरी गैरसमज झाला आहे. मी त्यांना कामाची यादी देतो. शहरात दीड हजार कोटींची कामे सुरू आहेत. त्याचे ठेकेदार सांगावेत.”

“आऊटर रिंगरोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार त्यांनी सांगावेत. त्याची यादी देतो. त्यातही गुजरातचे कोण ते सांगावे. घाटाची कामे सुरू आहे. सर्व यादी देतो. बाहेर राज्यातील ठेकेदार कोण आहे हे त्यांनी सांगावं. ऑनलाईन टेंडर कोणीही भरू शकतो. तरी सुद्धा बाहेरचे ठेकेदार कोण हे त्यांनी सांगावं.” असा संताप गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही