Share

आसाराम बापू यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का; ‘रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही’

सुप्रीम कोर्टाने AIIMS च्या अहवालाच्या आधारे आसाराम यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला असून त्यांना सध्या तुरुंगातच राहावे लागणार आहे.

Published On: 

Asaram Bapu interim bail rejected by Supreme Court

Asaram Bapu : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू (Asaram Bapu) यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने त्यांची प्रकृती लक्षात घेऊनही त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. जरी सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केले की प्रकृती बिघडल्यास आसाराम पुन्हा अंतरिम जामिनासाठी अर्ज करू शकतात, तरीही त्यांना सध्या तरी तुरुंगातच राहावे लागेल.

‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (AIIMS) च्या अहवालावर आधारित, सुप्रीम कोर्टाने आसाराम यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज प्रलंबित ठेवला आहे.

Asaram Bapu interim bail rejected by Supreme Court

एम्स (AIIMS) मध्ये उपचार घेत असलेल्या आसाराम यांच्याबाबत रुग्णालयाने सुप्रीम कोर्टाला कळवले की, त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. मात्र, त्यांना २४ तास वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्याची शिफारस रुग्णालयाने केली. अर्ज प्रलंबित ठेवताना न्यायालयाने नमूद केले की, प्रकृती खालावल्यास ते पुन्हा अंतरिम जामिनासाठी मागणी करू शकतात.

हाय कोर्टाकडून आसाराम यांना २० दिवसांचा पॅरोल

तुषार मेहता यांनी कोर्टाला माहिती दिली की, हाय कोर्टाने आसाराम यांना २० दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. अंतरिम जामिनाच्या अर्जावरील मागील सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाने एम्सकडून आरोग्य अहवाल मागवला होता. या अहवालाच्या आधारे कोर्टाने आता याचिका प्रलंबित ठेवून अंतरिम जामीन नाकारला आहे.

आसाराम यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे का?, यावर अहवाल देण्यास कोर्टाने एम्सला सांगितले होते. एम्सने त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिला, परंतु रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही