Share

ICC ची मोठी कारवाई! अखिलेश रेड्डीवर 8 वर्षांची बंदी; मॅच-फिक्सिंगमध्ये दोषी

अबू धाबी T10 लीगमधील मॅच-फिक्सिंग आणि भ्रष्टाचारविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ICC ने अमेरिकन क्रिकेटपटू अखिलेश रेड्डीवर 8 वर्षांची बंदी घातली आहे.

Published On: 

ICC bans USA cricketer Akhilesh Reddy for 8 years

अलीकडच्या काळात आयसीसीने (ICC) क्रिकेट विश्वातील मॅच-फिक्सिंगच्या घटनांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवले असून, अशा घटना आता दुर्मिळ झाल्या आहेत. तरीही, जेव्हा एखादी अशी घटना समोर येते, तेव्हा क्रिकेट विश्वात त्याबाबत जोरदार चर्चा रंगते. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

अमेरिकेचा खेळाडू बोडुगुम अखिलेश रेड्डी (Akhilesh Reddy) मॅच-फिक्सिंग (Match Fixing) मध्ये दोषी आढळला आहे. त्याच्यावर आयसीसीने कठोर नियमांची अमलबजावणी करत क्रिकेटमधून आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणाने अखिलेश रेड्डी यांना भ्रष्टाचार-विरोधी संहितेच्या तीन कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. मॅच-फिक्सिंगचे हे प्रकरण संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये २०२५ मध्ये झालेल्या अबू धाबी टी-१० स्पर्धेशी संबंधित आहे. या स्पर्धेसाठी एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या भ्रष्टाचार-विरोधी अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती.

ICC bans USA cricketer Akhilesh Reddy for 8 years

आयसीसीच्या (ICC) अहवालानुसार, अखिलेश रेड्डी यांच्यावरील बंदी २१ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होईल. याच तारखेपासून त्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले होते. आता त्यांच्यावर क्रिकेटशी संबंधित सर्व प्रकारच्या हालचालींवर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. अखिलेश रेड्डी यांना आयसीसीच्या कलम २.१.१, २.१.४ आणि २.४.७ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावर अबू धाबी टी-१० लीगशी संबंधित गंभीर आरोप आहेत.

यामध्ये सामन्यांचे निकाल निश्चित करणे (फिक्सिंग), सामन्यांमध्ये फेरफार करणे, खेळावर अयोग्य प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे आणि अशा फिक्सिंगशी संबंधित कट किंवा करारांमध्ये सहभागी होणे यांचा समावेश आहे. तसेच, मॅच-फिक्सिंगमध्ये सहभागी होण्यासाठी इतर खेळाडूंना किंवा व्यक्तींना आर्थिक प्रलोभने दाखवणे आणि मोबाईलवरील चॅट्स, संदेश किंवा महत्त्वाची माहिती (डेटा) नष्ट करून तपासात अडथळा आणणे, असे आरोपही त्यांच्यावर आहेत.

अखिलेश रेड्डी यांची क्रिकेट कारकीर्द

अखिलेश रेड्डी हे अबू धाबी टी-१० स्पर्धेतील ‘अस्पेन स्टॅलिन्स’ संघाचा भाग होते. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी एकूण चार टी-२० सामने खेळले. गोलंदाज म्हणून त्यांनी एक बळी घेतला, परंतु त्यांना फलंदाजीची संधी कधीच मिळाली नाही. एप्रिल २०२५ मध्ये ‘नॉर्थ अमेरिका टी-२० कप’ अंतर्गत केमन आयलंड्सविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय संघासाठी पदार्पण केले. २०२५ मध्ये अमेरिकेसाठी चार सामने खेळल्यानंतर, अबू धाबी टी-१० लीगमधील मॅच-फिक्सिंग प्रकरणात सहभाग असल्यामुळे वर्षाच्या अखेरीस त्यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्यात आली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही