Share

अमित शाहांचा पुणे दौरा, काँग्रेसचा राडा आणि पोलिसांची धरपकड; पुण्यात नेमकं चाललंय काय?

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसने कडाडून विरोध केल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यामुळे पुण्यात सध्या तणावाचे वातावरण आहे.

Published On: 

Amit Shah Pune visit heavy police security and congress workers protest

Amit Shah : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत. पण शहरात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झालाय! दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद थेट पुण्यात उमटले आहेत. शाह यांच्या दौऱ्याला काँग्रेसने काळे झेंडे दाखवण्याचा आणि जोरदार विरोधाचा इशारा दिलाय. त्यामुळेच, कोणतीही रिस्क न घेता पुणे पोलिसांनी थेट काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.

काल रात्रीपासूनच पुणे पोलिसांनी शहरात जबरदस्त फिल्डिंग लावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना थेट त्यांच्या घरातूनच ताब्यात घेण्यात आलं आहे. काँग्रेस कार्यकर्ते राहुल शिरसाट यांना पोलिसांनी घरातून उचललं. यासोबतच, अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे या कार्यकर्त्यांनाही काल रात्रीच येरवडा भागातून ताब्यात घेण्यात आलंय. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Amit Shah यांच्या दौऱ्याआधीच काँग्रेस-भाजप आमनेसामने!

थोडक्यात सांगायचं तर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज अमित शाहांच्या हस्ते ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ दिला जाणार आहे. पण दिल्लीत जंतरमंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी काँग्रेस आज आक्रमक झाली आहे. काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली उत्सव हॉटेल चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलीय. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्तेही निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत.

दुसरीकडे, पुण्यातील राजकारण आणखीच तापलं आहे. कारण, काँग्रेसला जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्तेही त्याच चौकात जमले आहेत. त्यामुळे पुण्यात आज मोठा राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, कटारिया महाविद्यालयातील कार्यक्रमस्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, डॉग स्क्वॉडद्वारे संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही