Ruchika Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईला जाहीरपणे शिवीगाळ करणाऱ्या त्या तरुणीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. या प्रकरणी आता एक मोठा ट्विस्ट आला आहे. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केल्याबद्दल रुचिका सिंह नावाच्या या मुलीवर थेट फौजदारी गुन्हा दाखल झालाय. पण आता या कारवाईला कडाडून विरोध सुरू झाला आहे.
कॉकरोच जनता पार्टीने या एफआयआरवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एका 15 वर्षांच्या मुलीवर फौजदारी कारवाई करणे हा सरकारी यंत्रणांचा गैरवापर असल्याचा थेट आरोप पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केला आहे. शिवीगाळ केल्यावर मानहानीचा खटला दाखल होऊ शकतो, पण फौजदारी गुन्हा कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
FIR on Ruchika Singh: ‘आधी भाजपच्या १०० खासदारांवर कारवाई करा’
सौरभ दास यांनी ट्विट करत या कारवाईचा तीव्र निषेध केला. त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. लोकसभेतील ५० टक्के आणि भाजपच्या जवळपास १०० खासदारांवर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी आपली ऊर्जा आधी या खासदारांवर केंद्रित करावी. एका तरुण मुलीचा असा छळ त्वरित थांबला पाहिजे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे.
दुसरीकडे, या प्रकरणी पोलिसांची कारवाई वेगाने सुरू आहे. गाझियाबादमध्ये राहणाऱ्या स्मृती सिंह यांनी नोएडातील एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात रुचिकाविरोधात रीतसर तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हेतुपुरस्सर अपमान आणि सार्वजनिक उपद्रवाच्या आरोपाखाली तिच्यावर झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल केला. आता पुढील तपासासाठी हे प्रकरण नवी दिल्लीच्या पार्लमेंट स्ट्रीट पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे.
या तरुणीने पंतप्रधान Narendra Modi आणि त्यांच्या आईबद्दल वापरलेली भाषा देशाची प्रतिमा मलिन करणारी आहे, असा दावा तक्रारदार स्मृती सिंह यांनी केला आहे. २३ जुलै रोजी जंतर मंतरवर हा सर्व प्रकार घडला होता. आता या प्रकरणी दिल्ली पोलीस नेमकी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जुन्या गाड्यांमध्ये E-20 पेट्रोल टाकताय? नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी कबुली; ‘या’ वाहनांचे होणार नुकसान
- सुनेत्रा पवारांच्या बैठकीतून घरी; बीडमध्ये ४५ लाखांची लाच घेताना वन अधिकारी जाळ्यात
- 8th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट तिप्पट वाढ? १८ हजारांवरून ६९ हजारांच्या आकड्यामागचं गणित काय?













