नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पक्षाने आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवरून“कुर्सी छोड़ने की करो तैयारी, इस्तीफा देने की तुम्हारी बारी” असा संदेश देत “अमित शाह इस्तीफा दो” (AmitShahIstifaDo) असा संदेश दिला. हा संदेश काँग्रेस (Congress) पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया (Social Media) पोस्टद्वारे शेअर करण्यात आला.
जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यानंतर झालेली पोलीस कारवाई आणि त्यातून निर्माण झालेला राजकीय वाद या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरू करण्यात आल्याचे मानले जात आहे. आंदोलकांवर कथित लाठीचार्ज आणि दडपशाही केल्याप्रकरणी काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत थेट अमित शहा यांना लक्ष्य केले आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये ही भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली.
Congress demands Amit Shah resignation through social media
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अलीकडेच अमित शहा यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईबाबत त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. तसेच या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या या पोस्टमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. भाजपने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, सोशल मीडियावर “अमित शाह इस्तीफा दो” वेगाने चर्चेत आला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ‘X’ हँडलवरून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये अमित शहा यांच्या राजीनाम्याची स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘40 लाख कथित बांगलादेशींनी भरले गणना पत्र’; SIR प्रक्रियेवर किरीट सोमय्यांचा मोठा दावा
- FDAचा दावा फसला? मंत्रालयाच्या कँटीनमध्ये तपासणीत सापडल्या माश्या; कोर्टात अहवाल सादर होणार
- भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा; मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश













