🕒 1 min read
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना ताप आणि अशक्तपणाचा त्रास जाणवल्याने ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital) दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सततचा दौरा, राजकीय कार्यक्रम आणि कामाच्या वाढत्या ताणामुळे त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याचे सांगितले जात आहे.
अलीकडील राजकीय घडामोडी, ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम, पक्षप्रवेश कार्यक्रम आणि आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीमुळे त्यांना पुरेशी विश्रांती मिळाली नव्हती. याच धावपळीचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना आज (शनिवार) संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाण्यात होणारे काही नियोजित राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले. मात्र, मध्यरात्री खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडला.
📌 महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Rain Alert: 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
- Cloud Research: ढगांमध्ये आढळले ब्लॅक कार्बनचे कण; पावसाच्या प्रक्रियेवर होऊ शकतो परिणाम
- दिल्लीत हालचालींना वेग! अमित शाह उपपंतप्रधान होणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












