Share

Rain Alert India: बंगालच्या खाडीत कमी दाब; देशभर पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Published On: 

Rain Alert India

🕒 1 min read

Rain Alert India: देशभरात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील पाच दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठा बदल होणार असून भारतीय हवामान विभागाने (IMD) विविध राज्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. (IMD Rain Alert)

महाराष्ट्रासह पश्चिम भारतात जोरदार पाऊस

3 ते 6 जुलैदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात 3 ते 9 जुलैदरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (India Weather)

मध्य भारतातही पावसाचा जोर

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 3 ते 9 जुलैदरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः 3 आणि 4 जुलै रोजी मध्य प्रदेशातील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतासाठीही अलर्ट

5 ते 9 जुलैदरम्यान हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 6 ते 8 जुलैदरम्यान हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि चंदीगडमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशात 8 आणि 9 जुलैला मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्येही पावसासोबत वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पूर्व आणि ईशान्य भारतातही पावसाचा इशारा

3 ते 8 जुलैदरम्यान झारखंड आणि ओडिशामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये 3 ते 6 जुलैदरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. बिहारमध्ये 5 आणि 6 जुलैला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये 4 ते 6 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढेल. नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये 3 ते 9 जुलैदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

अंदमान-निकोबारमध्येही पावसाचा प्रभाव

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहात 3 ते 9 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही