वयाच्या ५१ व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने भुरळ घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री काजोलने (Kajol) आता स्वतःचाच एक नवा ‘रिसर्च’ शोधून काढलाय, हे तुम्हाला माहितीये का?
रुपेरी पडद्यापासून सध्या ती थोडी दूर असली, तरी सोशल मीडियावर काजोलचा दबदबा कायम आहे. नुकतेच तिने साडीतले काही अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यासोबत तिने दिलेलं कॅप्शन सध्या जोरदार चर्चेत आहे.
Kajol Saree Look
या फोटोंमध्ये काजोल नेहमीप्रमाणेच कमालीची सुंदर दिसत आहे. पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते तिच्या मजेशीर कॅप्शनने.
फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, “माझ्या पोस्ट्सना पसंती देणारे लोक, न देणाऱ्यांच्या तुलनेत अधिक आनंदी, अधिक बुद्धिमान आणि अधिक सुंदर असतात — अर्थात, हा अभ्यास मी स्वतःच बनवला आहे.”
तिचं हे विनोदी विधान वाचून चाहत्यांनाही हसू आवरलेलं नाही. वेस्टर्न ड्रेस असो वा पारंपरिक साडी, काजोल नेहमीच चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. तिच्या या नव्या लूकवर चाहते सध्या फिदा झाले आहेत. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- राम मंदिर प्रकरणावर RSS ची स्पष्ट भूमिका! ‘हिंदू समाजाने अफवांना बळी पडू नये’
- प्राजक्ता माळीने दाखवली कर्जतच्या आलिशान फार्महाऊसची झलक; किती आहे एका दिवसाचे भाडे?
- तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; ‘Save Food Save Drug’ मोहीम, नवीन नियम जारी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








