घसा बसला, तरीही मंचावर; सोनू निगमला नेमका कोणता गंभीर आजार झालाय?

प्रसिद्ध गायक सोनू निगम ‘पिंच्ड नर्व्ह्स’ या वेदनादायी आजाराने त्रस्त आहे. औषधांमुळे घसा बसला असला तरी त्याने आपली लाईव्ह कॉन्सर्ट रद्द करण्यास नकार दिलाय.

Published On: 

Sonu Nigam Health Update singer performing on stage while unwell

एखाद्या गायकासाठी त्याचा आवाज आणि घसा हेच सर्वस्व असतं, पण जर ऐन लाईव्ह कॉन्सर्टच्या आधीच घसा बसला तर काय अवस्था होईल? अशीच काहीशी आणि वेदनादायी परिस्थिती सध्या बॉलिवूडचा लाडका गायक सोनू निगम (Sonu Nigam Health) अनुभवतोय.

सध्या सोनूच्या एका व्हिडीओने त्याच्या चाहत्यांची चिंता चांगलीच वाढवली आहे. मुंबईतील एका लाईव्ह कॉन्सर्टपूर्वी त्याने स्वतःच्या प्रकृतीबाबत मोठा खुलासा केला. तो एका गंभीर आणि अत्यंत वेदनादायी आजाराचा सामना करत आहे. तरीही एवढा त्रास सहन करून त्याने आपली व्यावसायिक बांधिलकी मोडलेली नाही.

Sonu Nigam Health Update 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि खुद्द सोनूने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, त्याला ‘पिंच्ड नर्व्ह्स’चा (Pinched Nerves) (नसा दबल्या जाणे) प्रचंड त्रास होत आहे.

आजाराचं नेमकं कारण शोधण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून तो रुग्णालयाच्या चकरा मारतोय. त्याचे सतत एमआरआय आणि सीटी स्कॅन सुरू आहेत. वेदना इतक्या असह्य आहेत की, त्यातून थोडा दिलासा मिळवण्यासाठी त्याला हेवी पेन किलर्सचा आधार घ्यावा लागत आहे.

दुसरीकडे, या उपचारांचा एक वेगळाच फटका त्याला बसला आहे. नसांना रिलॅक्स करण्यासाठी दिलेल्या औषधांचा थेट परिणाम त्याच्या आवाजावर आणि घशावर झाला आहे.

एका गायकासाठी ऐन कार्यक्रमापूर्वी घसा दुखणे ही खूप मोठी चिंतेची बाब असते. पण, या कठीण काळातही सोनूने माघार घेतलेली नाही. प्रकृती साथ देत नसतानाही त्याने मुंबईतील आपली लाईव्ह कॉन्सर्ट रद्द न करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

आपल्या प्रकृतीबद्दल बोलताना सोनू म्हणाला, “माझी सध्या हालत एकदम खराब आहे. नसा दबल्या गेल्या आहेत. फिजिओथेरेपी घेतानाही प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.” पण बऱ्याच काळानंतर तो स्टेजवर परतत असल्याने, त्याने वेदना बाजूला ठेवून चाहत्यांसाठी गाण्याचं ठरवलं.

त्याच्या या जिद्दीचं आणि कामावरच्या प्रेमाचं सोशल मीडियावर भरपूर कौतुक होत आहे, पण त्याचवेळी चाहत्यांमध्ये त्याच्या तब्येतीबद्दल काळजीचं वातावरणही पाहायला मिळतंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही