कपिल शर्माच्या घरावर गोळीबार? व्हायरल व्हिडीओनंतर खळबळ, पोलिसांच्या खुलाशामुळे मोठा ट्विस्ट!

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या अमृतसर येथील घरावर गोळीबार झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावत सत्य परिस्थिती सांगितली आहे.

Published On: 

Kapil Sharma News: कपिल शर्माच्या घरावर फायरिंग? सत्य आलं समोर!

सोशल मीडियावर कधी कोणती अफवा वाऱ्यासारखी पसरेल हे सांगता येत नाही, याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आलाय. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) अमृतसरमधील घरावर थेट गोळीबार झाल्याचा एक व्हिडीओ अचानक व्हायरल झाला आणि देशभरात एकच खळबळ उडाली.

हॉली सिटी या पॉश भागातील कपिलच्या बंगल्याबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी दोन राऊंड फायरिंग केल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. हल्लेखोर गोळीबार करून पसार झाले आणि कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली, अशा बातम्या पसरल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

Kapil Sharma News

अमृतसर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत वस्तुस्थिती समोर आणली आहे. “कपिल शर्माच्या घरावर कोणताही गोळीबार झालेला नाही, या निव्वळ अफवा आहेत,” असे स्पष्टीकरण अमृतसर पोलीस आयुक्तालयाने दिले आहे. नागरिकांनी अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, या अफवांना जोर मिळण्यामागे कॅनडातील एक घटना कारणीभूत ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच कॅनडाच्या सरे शहरात कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’जवळ (Kaps Cafe) चौथ्यांदा गोळीबार झाला होता. तिथे शेजारील ‘चाय सुट्टा बार’ला लक्ष्य करण्यात आले होते.

या घटनेनंतर ‘टायसन बिश्नोई जोरा सिद्ध’ नावाच्या एका कथित व्यक्तीने सोशल मीडियावर धक्कादायक पोस्ट केली होती. “हा हल्ला केवळ एक मेसेज आहे, कपिल शर्माने वेळीच ऐकले नाही तर पुढचे टार्गेट त्याचे मुंबईतील घर असेल,” अशी थेट धमकी या पोस्टमधून देण्यात आली होती.

या जुन्या घटनेमुळेच आता अमृतसरच्या गोळीबाराची खोटी बातमी पसरल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनुसार, कॅनडातील घटनेचा तपास अद्याप सुरू असून कपिलने यावर अधिकृत भाष्य करणे टाळले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही