🕒 1 min read
गंभीर विषयावर सिनेमा बनवायचा आणि त्यात आयटम साँगची फोडणी द्यायची, हे समीकरण तसं नवीन नाही. पण शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या संघर्षासारख्या ज्वलंत विषयावर बेतलेल्या सिनेमात जेव्हा थेट सनी लिओनी आणि गौतमी पाटील एकत्र येतात, तेव्हा चर्चा तर होणारच ना?
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात The Maharashtra Files या बहुचर्चित सिनेमाचीच जोरदार हवा आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य म्युझिक लाँच सोहळा मुंबईत पार पडला. एका बाजूला सामान्य शेतकरी कुटुंबाचा न्यायासाठीचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला सपना चौधरी, गौतमी पाटील (Gautami Patil) अन् सनी लिओनीचा (Sunny Leone) ग्लॅमरस तडका, असा भन्नाट प्रयोग या निमित्ताने पाहायला मिळतोय.
The Maharashtra Files
या झगमगत्या सोहळ्यात सपना चौधरीने ‘मार तू शिक्का’ या गाण्यावर ठेका धरला. आनंद शिंदे आणि वैशाली माडे यांच्या आवाजातील हे गाणं सध्या धुमाकूळ घालतंय. तर दुसरीकडे, संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या गौतमी पाटीलवर चित्रित झालेलं ‘छम्मो’ हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरत आहे.
पण सोहळ्यात सर्वांच्या भुवया उंचावल्या त्या सनी लिओनीच्या ‘शांताबाई’ या गाण्यामुळे! शेतकऱ्यांचं वास्तव मांडणाऱ्या या सिनेमात या गाण्यांचा नक्की काय संदर्भ असेल, याचीच मोठी उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे. शिवाय, अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजातील ‘मन पाखरू’ या गाण्याने उपस्थितांना चांगलीच भुरळ घातली.
या भव्य सोहळ्याला सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, मंगेश देसाई यांसारखी दिग्गज मंडळी उपस्थित होती. दिग्दर्शक संजीवकुमार राठोड यांचा हा सिनेमा येत्या २९ मे २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर धडकणार आहे. तोपर्यंत या ग्लॅमरस तडक्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर तापलेलीच राहणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता? RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा म्हणाले…..
- राकेश-तेजश्रीच्या लग्नाची चर्चा, बहिणीने अखेर सत्य सांगितलंच; आईलाही बसला होता मोठा धक्का!
- पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या काय आहेत नवे दर?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












