अमेरिका-इराण तडजोडीचा भारताला मोठा जॅकपॉट; कच्च्या तेलाचे भाव कोसळले, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १५ टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Published On: 

Crude Oil Prices Fall: कच्च्या तेलाचे भाव १५% नी कोसळले!

महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अचानक अशी काही घडामोड झालीये, ज्याचा थेट फायदा तुमच्या-आमच्या खिशाला होणार आहे! अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हं मिळताच, जागतिक बाजारात Crude Oil Prices मध्ये भयंकर मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर चक्क १२ ते १५ टक्क्यांनी खाली आले आहेत. आखाती देशांतून येणारं ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ९७ डॉलरच्या खाली पोहोचलंय. याचा मोठा इम्पॅक्ट भारतीय वायदे बाजारातही (MCX) दिसला असून, इथं कच्च्या तेलाचे दर १३.५० टक्क्यांनी कोसळून ८३८० रुपये प्रति बॅरलवर आलेत. सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर, देशात कच्चं तेल लिटरमागे तब्बल ८.२९ रुपयांनी स्वस्त झालंय.

Crude Oil Prices Fall

वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये एका महत्त्वाच्या करारावर प्राथमिक चर्चा सुरू आहे. इराणवरील निर्बंध शिथिल होण्याचे संकेत मिळत आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील कारवाया तात्पुरत्या थांबवल्यामुळे युद्धाची भीती कमी झालीये. परिणामी अमेरिकन कच्च्या तेलाची (WTI) किंमतही उच्चांकावरून १५ टक्क्यांनी घसरून ८९ डॉलरच्या खाली आलीये.

भारतासाठी ही परिस्थिती म्हणजे मोठी लॉटरीच आहे. आपला देश गरजेचं तब्बल ८८ टक्के तेल आयात करतो. कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे देशाचे आयात बिल मोठ्या प्रमाणावर वाचेल. डॉलरच्या तुलनेत रुपया आधीच ६१ पैशांनी वधारला आहे. आयात महागाई आटोक्यात आल्याने, आगामी काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही