Share

IND vs PAK : भारत-पाक सामना रद्द होणार? पाकिस्तानच्या ‘त्या’ निर्णयावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

पाकिस्तान सरकारने टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यावर बीसीसीआयने अद्याप अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Published On: 

IND vs PAK Boycott: पाकिस्तानचा भारतासोबत खेळण्यास नकार? BCCI ची मोठी प्रतिक्रिया

ज्या महामुकाबल्याची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत असतं, त्या भारत-पाकिस्तान सामन्यावर (IND vs PAK) आता अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत. क्रिकेटच्या मैदानात राजकारण नको असं कितीही म्हटलं तरी, पुन्हा एकदा राजकारणामुळेच चाहत्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान सरकारने घेतलेल्या एका धक्कादायक निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शहबाज शरीफ सरकारने टी-20 वर्ल्ड कप 2026 बाबत एक अजब भूमिका घेतली आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेत सहभागी होईल, इतर सर्व सामने खेळेल, पण १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकेल, अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली असून, कोलंबोमध्ये होणाऱ्या या हाय-व्होल्टेज सामन्यात आपला संघ उतरवणार नसल्याचे संकेत दिले आहेत. बांगलादेशबाबत आयसीसीने घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

IND vs PAK Boycott

या सर्व घडामोडींवर आता बीसीसीआयने (BCCI) अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया (Devjit Saikia) यांनी स्पष्ट केलं की, “पाकिस्तानने सामना बहिष्कृत केल्याबाबत बीसीसीआयला अजून कोणतीही अधिकृत सूचना (Official Communication) मिळालेली नाही. आम्ही त्यांच्या अधिकृत निवेदनाची वाट पाहत आहोत.” त्यामुळे जोपर्यंत अधिकृत पत्र येत नाही, तोपर्यंत बीसीसीआय कोणतीही भूमिका घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या या हट्टापायी त्यांनाच कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्ल्डकपमधील भारत-पाक सामना हा आयसीसीसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी मानला जातो. जर हा सामना रद्द झाला, तर त्याचे मोठे आर्थिक परिणाम पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भोगावे लागू शकतात. आता आयसीसी यावर काय तोडगा काढणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही