Share

शाहीद कपूरचा बॉलिवूडला ‘घरचा आहेर’; म्हणाला, “येथे आता चांगले सिनेमेच…” वक्तव्याने खळबळ!

शाहीद कपूरने बॉलिवूडमधील सिनेमांच्या दर्जावर सडेतोड मत मांडले आहे. “आपण चांगले सिनेमे बनवत नाही,” असे म्हणत त्याने इंडस्ट्रीला आरसा दाखवला.

Published On: 

Shahid Kapoor Statement: बॉलिवूडला दाखवला आरसा!

तुम्हाला आठवतंय, शेवटचा असा कोणता हिंदी सिनेमा होता ज्याने तुम्हाला थिएटरमध्ये खिळवून ठेवलं होतं? हल्ली बॉलिवूडचे (Bollywood) सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस का उतरत नाहीत, यावर अनेकदा चर्चा झडतात. पण आता खुद्द इंडस्ट्रीतल्याच एका स्टारने म्हणजेच शाहीद कपूरने (Shahid Kapoor) यावर रोखठोक भाष्य करत सर्वांना आरसा दाखवला आहे. त्याच्या या विधानानं सिनेवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सध्या शाहीद कपूर त्याच्या आगामी ‘ओ रोमियो’ (O Romeo) या सिनेमामुळे चर्चेत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान बोलताना शाहीदने इंडस्ट्रीतील बदलत्या प्रवाहावर बोट ठेवलं. तो म्हणाला की, “प्रेक्षक चित्रपट पाहू इच्छित नाहीत असं नाही, तर मूळ मुद्दा हा आहे की आपण पाहिजे तितके चांगले सिनेमे बनवत नाही.” शाहीदच्या या प्रांजळ कबुलीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Shahid Kapoor Statement

प्रेक्षकांचा ‘अटेंशन स्पॅन’ कमी झालाय हे मान्य करतानाच शाहीदने मेकर्सनाही सुनावले. तो म्हणाला, “निर्माते जेव्हा काम करायला बसतात, तेव्हा त्यांची क्रिएटिव्हिटी कमी पडते. प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन हवं असतं, पण आपण ते देण्यात कमी पडतोय.” हे सांगताना त्याने मार्केटिंगच्या अतिरेकावरही भाष्य केलं. “जेव्हा कलेत बनावटगिरी येते, तेव्हा ती नैसर्गिक वाटत नाही. फक्त आकडे आणि व्यवसायासाठी काम केलं तर तो फक्त धंदा राहतो, कला नाही,” अशा शब्दांत शाहीदने इंडस्ट्रीची कानउघाडणी केली आहे.

शाहीद कपूरचा हा आगामी सिनेमा १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधीच त्याने दिलेल्या या ‘घरच्या आहेरा’मुळे (Reality Check) इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे. आता शाहीदच्या या वक्तव्यावर इतर कलाकार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही