‘मी हा प्रवास इथेच थांबवतोय’; अरिजीत सिंहचा मोठा निर्णय, बॉलिवूडला रामराम!

अरिजीत सिंहने पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. “मी हा प्रवास इथेच थांबवतोय,” अशी भावूक पोस्ट त्याने शेअर केली आहे.

Published On: 

Arijit Singh Retirement: अरिजीत सिंहचा मोठा निर्णय, बॉलिवूड गाणी सोडली?

“तुम ही हो…” म्हणत ज्याने तरुणाईला प्रेमाची भाषा शिकवली, त्या आवाजाची जादू आता मोठ्या पडद्यावर पुन्हा अनुभवायला मिळणार नाही, यावर तुमचा विश्वास बसेल? पण हे खरं आहे. कोट्यवधी दिलांच्या धडकनीवर राज्य करणाऱ्या अरिजीत सिंहने (Arijit Singh) आपल्या एका निर्णयाने संपूर्ण देशाला धक्का दिला आहे. बॉलिवूडच्या या ‘बादशहा’ने पार्श्वगायनातून (Playback Singing) निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच सुन्न केलं आहे.

अरिजीतने इन्स्टाग्रामवर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्याने थेट बॉम्बच टाकला. तो म्हणतो, “यापुढे मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. मी हा प्रवास इथेच थांबवत आहे.” त्याच्या या एका वाक्याने सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली आहे.

Arijit Singh Retirement

“गेल्या काही वर्षांत मला भरभरून प्रेम देणाऱ्या श्रोत्यांचे आभार. पण मी स्पष्ट करू इच्छितो की, मी पार्श्वगायक म्हणून काम थांबवत आहे,” असे त्याने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, त्याने हे पाऊल का उचलले, याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

2005 मध्ये ‘फेम गुरुकुल’ मधून सुरू झालेला हा प्रवास ‘मर्डर 2’ च्या “फिर मोहब्बत” ने बॉलिवूडमध्ये स्थिरावला. ‘केसरिया’, ‘बिनते दिल’ सारखी अनेक सुपरहिट (Superhit) गाणी देणाऱ्या अरिजीतला 2025 मध्येच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता तो कदाचित फक्त ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ किंवा ‘स्वतंत्र संगीत’ (Independent Music) क्षेत्रात दिसेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण चाहत्यांसाठी हा निर्णय पचवणं नक्कीच कठीण जातंय. “दादा, निर्णय मागे घे,” अशी विनवणी कमेंट्समध्ये होताना दिसतेय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही