Share

अभिषेक शर्माने मोडला युवराज सिंगचा रेकॉर्ड, नागपुरात धावांचा पाऊस!

नागपूर टी-२० मध्ये अभिषेक शर्माने २२ चेंडूत ५० धावा करत युवराज सिंगचा षटकारांचा विक्रम मोडला आहे. भारताची खराब सुरुवात सावरण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

Published On: 

Abhishek Sharma Breaks Yuvraj Record: अभिषेकची 'फायर' बॅटिंग, युवराजला टाकलं मागे

नव्या वर्षाची (२०२६) सुरुवात कशी असावी, याचं उत्तम उदाहरण आज टीम इंडियाच्या ‘या’ पठ्ठ्याने घालून दिलंय. ज्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती, तोच अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आज नागपूरच्या मैदानात असा काही तळपला की, त्याने थेट आपला गुरु आणि सिक्सर किंग युवराज सिंगलाच मागे टाकलं. भारताची अवस्था बिकट असताना अभिषेकने केलेली फटकेबाजी पाहून स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगला बोलावलं. सुरुवातीलाच भारताला मोठे धक्के बसले. संजू सॅमसन (१०) आणि ७८५ दिवसांनी परतलेला ईशान किशन (८) स्वस्तात माघारी परतले. धावफलकावर २ बाद २७ अशी नाजूक परिस्थिती असताना, प्रेक्षकांचे श्वास रोखले गेले होते. पण, असं असलं तरी अभिषेक शर्माने हार मानली नाही. त्याने कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या साथीने किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली.

Abhishek Sharma Breaks Yuvraj Record

या सामन्यात अभिषेकने फक्त २२ चेंडूत ५० धावा कुटल्या. २०२२ च्या स्टाईलने खेळताना त्याने ४ खणखणीत चौकार आणि ४ उत्तुंग षटकार लगावले. विशेष म्हणजे, २०२६ या वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याचा २२७.२७ चा स्ट्राईक रेट पाहून किवी बॉलरही अवाक झाले.

अभिषेकने आज चक्क युवराज सिंगचा (Yuvraj Singh) टी-२० मधील षटकारांचा विक्रम मोडीत काढला. या सामन्यापूर्वी त्याला युवराजला मागे टाकण्यासाठी फक्त २ सिक्स हवे होते. डावाच्या पाचव्या ओव्हरमध्ये काईल जेमिसनला पहिल्याच बॉलवर सिक्स मारत त्याने हा पराक्रम केला. युवराजने ५८ सामन्यांत ७४ षटकार मारले होते, तर अभिषेकने हा पल्ला अवघ्या ३४ व्या सामन्यातच गाठला आहे. त्यामुळेच आता “शिष्य गुरुपेक्षा वरचढ ठरला,” अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

दुसरीकडे, अभिषेक आणि सूर्याच्या या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला असून, न्यूझीलंडसमोर आता तगड्या आव्हानाची शक्यता निर्माण झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही