🕒 1 min read
मुंबई – महानगरपालिकेवर (Mumbai Mayor Election) भाजपचा झेंडा फडकला असला, तरी आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, “मुंबईचा प्रथम नागरिक कोण होणार?” देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलंय की मुंबईचा महापौर हा ‘मराठी’च असेल. या शर्यतीत भाजपच्या अनेक दिग्गजांची नावे चर्चेत असली, तरी एका नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ते नाव म्हणजे प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde)!
प्रभाकर शिंदे हे भाजपचे ‘जुने जाणते’ आणि आक्रमक नेते मानले जातात. विशेष म्हणजे, ते मूळचे शिवसैनिक! अनेक वर्षे शिवसेनेत काम केल्यामुळे त्यांना ठाकरे गटाची (UBT) प्रत्येक चाल आणि रणनीती माहिती आहे. महापालिकेत गटनेते म्हणून काम करताना त्यांनी प्रशासनावर ज्या प्रकारे पकड मिळवली होती, ते पाहता भाजपसाठी हा ‘हुकमी एक्का’ ठरू शकतो.
Mumbai Mayor Candidate 2026
ठाकरेंना शह देण्यासाठी ‘परफेक्ट’ उमेदवार?
उद्धव ठाकरेंच्या ‘मराठी अस्मिता’ कार्डला उत्तर देण्यासाठी भाजपला एका तगड्या मराठी चेहऱ्याची गरज आहे. प्रभाकर शिंदे हे केवळ मराठीच नाहीत, तर ते आक्रमक वक्तृत्वासाठी ओळखले जातात. स्थायी समितीपासून ते गटनेते पदापर्यंतचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. “शिवसेनेच्या (UBT) बालेकिल्ल्यात घुसून वार करायचा असेल, तर शिंदेंसारखा ‘लेढाऊ’ नेताच हवा,” अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.
विनोद मिश्राही शर्यतीत? दुसरीकडे, भाजपचे आणखी एक फायरब्रँड नेते विनोद मिश्रा (Vinod Mishra) यांचेही नाव चर्चेत आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी ज्या प्रकारे मागील सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते, त्यामुळे त्यांची दावेदारीही प्रबळ मानली जातेय. पण फडणवीसांनी ‘मराठी महापौर’ शब्दाचा उच्चार केल्याने प्रभाकर शिंदेंचं पारडं सध्या तरी जड वाटतंय.
तरीही, भाजपमध्ये नाव कोणाचंही चर्चेत असलं, तरी लिफाफा मात्र ऐनवेळीच उघडतो. त्यामुळे फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आशिष शेलार शेवटच्या क्षणी कोणता ‘गुगली’ टाकतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोस्टल रोडवर मुंबईकरांचा उत्साह; मॅरेथॉनमध्ये आमिर खानने सहकुटुंब घेतला भाग
- निशा परुळेकर यांचा ‘काटाकिर्र’ विजय; ठाकरेंच्या नेत्याचा गेम ओव्हर, भाजपचा गुलाल उधळला!
- रवीना टंडनने शिवसेनेसाठी घाम गाळला, पण मतदानालाच दांडी; अचानक असं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












