Aamir Khan: ‘हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे…’ आमिरच्या एका वाक्याने जिंकली मुंबईकरांची मनं!

मतदानानंतर पत्रकारांनी हिंदीत बोलण्याचा आग्रह करताच Aamir Khan ने सुनावले, ‘हा महाराष्ट्र आहे, हिंदीत का बोलू?’ व्हिडिओ व्हायरल.

Published On: 

aamir khan BMC Election

मुंबई – ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा राजकीय वाद पेटला असतानाच, एका बॉलिवूड सुपरस्टारने घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एरवी बॉलिवूड कलाकार हिंदी किंवा इंग्रजीतून प्रतिक्रिया देतात, पण मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) जे उत्तर दिलंय, त्यामुळे ‘राजकारण तापलं’ असतानाच एक सुखद धक्का बसला आहे.

झाले असे की, मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांसाठी आज मतदान पार पडले. सामान्य मुंबईकरांप्रमाणेच सेलिब्रिटींनीही रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. यातच अभिनेता Aamir Khan जेव्हा मतदान करून बाहेर आला, तेव्हा मीडियाने त्याला गराडा घातला. आमिरने अतिशय नम्रपणे मराठीतून संवाद साधत, ‘नक्की या आणि वोट द्या,’ असे आवाहन मुंबईकरांना केले.

पत्रकाराच्या प्रश्नावर Aamir Khan चे रोखठोक उत्तर

आमिर खान मराठीत बोलत असल्याचे पाहून एका पत्रकाराने त्याला ‘हीच प्रतिक्रिया हिंदीत द्या,’ अशी विनंती केली. यावर आमिरने क्षणाचाही विलंब न लावता जे उत्तर दिले, त्याने उपस्थितांची मनं जिंकली. आमिर स्पष्ट शब्दांत म्हणाला, “हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे…” त्याच्या या उत्तराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पत्रकारांनी जेव्हा समजावून सांगितले की, ही बातमी दिल्ली आणि राष्ट्रीय स्तरावरही दाखवली जाईल, तेव्हा आमिरने हिंदीत प्रतिक्रिया दिली. “इथे महापालिकेने खूप चांगली व्यवस्था केली आहे,” असे तो नंतर म्हणाला. पण त्याची पहिली प्रतिक्रिया मात्र नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

एकीकडे भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ‘मुंबईचा महापौर हिंदी भाषिकच होईल’ असे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. दुसरीकडे, याच मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. अशातच आमिर खानसारख्या (Aamir Khan) बड्या अभिनेत्याने ‘हा महाराष्ट्र आहे’ म्हणत मराठी भाषेचा केलेला सन्मान, राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही