माझ्या बाबांवर कर्जाचं ओझं….; मतदानानंतर तरुणीने भररस्त्यात धरले पाय, अक्षयने जे केलं ते पाहून…

मतदान केंद्राबाहेर एका तरुणीने मदतीसाठी अक्षय कुमारचे पाय धरले. वडिलांच्या कर्जासाठी रडणाऱ्या या मुलीला अक्षयने ज्या प्रकारे मदत केली, तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Published On: 

Akshay Kumar Viral Video: तरुणीने भररस्त्यात धरले पाय! अक्षयची कृती चर्चेत

मुंबई – सिनेमाच्या पडद्यावर हिरो होणं सोपं असतं, पण खऱ्या आयुष्यात ‘हिरो’ व्हायला मोठं काळीज लागतं, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा मुंबईकरांना आला. निमित्त होतं महापालिका निवडणुकीचं, पण चर्चा झाली ती Akshay Kumar च्या एका कृतीची. सध्या महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतदानाची रणधुमाळी सुरू आहे. सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अक्षय कुमार मतदान केंद्रावर पोहोचला. पण मतदान करून बाहेर पडताना जे घडलं, त्याने उपस्थितांचे डोळे पाणावले.

Akshay Kumar Vote Video

अक्षय कुमार नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच मतदानासाठी पोहोचला. बाहेर आल्यावर त्याने माध्यमांशी बोलताना, “आज रिमोट कंट्रोल आपल्या हातात आहे, त्यामुळे मुंबईकरांनी बाहेर पडून मतदान करा,” असं आवाहन केलं. तो आपल्या गाडीकडे जात असतानाच अचानक एक तरुणी धावत आली आणि तिने भररस्त्यात अक्षयचे पाय धरले. ती रडत विनवणी करू लागली, “माझे बाबा कर्जबाजारी झाले आहेत. कृपया त्यांना या अडचणीतून बाहेर काढा…”

अशा वेळी अनेक सेलिब्रिटी दुर्लक्ष करून निघून जातात, पण अक्षय थांबला. त्याने त्या मुलीला शांत केलं. तिची अडचण समजून घेतली आणि लगेच आपल्या टीममधील एका सदस्याला त्या मुलीचा फोन नंबर घेण्यास सांगितलं. मुलीने पुन्हा त्याचे पाय धरण्याचा प्रयत्न केला, पण अक्षयने तिला धीर दिला.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सुसाट व्हायरल होत आहे. नेटकरी अक्षयच्या या संवेदनशीलतेचं कौतुक करत आहेत. कोणी म्हणतंय, “कोणाच्या मदतीसाठी पुढे येणं यालाच हिरोपंती म्हणतात,” तर कोणी “अक्कीचं मन खूप मोठं आहे,” अशा शब्दांत त्याला दाद देत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही