Share

पुण्यात भाजप नेत्याच्या वॉर्डात राडा; आरोपी येरवड्यात, मग मतदान कुणी केलं?

पुण्यात भाजप नेत्याच्या वॉर्डात येरवडा जेलमधील आरोपीच्या नावे बोगस मतदान; रोहित पवारांनी आयोगाच्या कारभारावर उपस्थित केले गंभीर प्रश्न.

Published On: 

Mahapalika Election | Pune Bogus Voting

🕒 1 min read

पुणे – लोकशाहीत काय चमत्कार होईल हे सांगता येत नाही, याचाच एक धक्कादायक नमुना आज पुण्यात बघायला मिळाला. माणूस प्रत्यक्ष हजर नसतानाही त्याचं मतदान कसं होऊ शकतं? असा प्रश्न सध्या पुणेकर विचारत आहेत. कारण, खुद्द येरवडा जेलमध्ये बंद असलेल्या एका आरोपीचं मतदान पार पडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Shocking Pune Bogus Voting

पुण्यातील प्रभाग क्रमांक २४ मधील सरस्वती मंदिर या केंद्रावर हा गंभीर प्रकार घडलाय. विशेष म्हणजे, हा वॉर्ड भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांचा आहे. इथे एका आरोपीचं नाव मतदार यादीत होतं, तो सध्या जेलमध्ये आहे, तरीही त्याच्या नावावर कुणीतरी Bogus Voting करून गेल्याचं उघड झालं. यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना चांगलंच घेराव घातलं, पण अधिकाऱ्यांकडे याचं कुठलंही उत्तर नव्हतं.

गोंधळ इथेच थांबला नाही. प्रभाग २१ मधील कटारिया हायस्कूलमध्ये शेख हसीना नावाच्या महिला मतदानाला गेल्या. त्या गेल्या ३५ वर्षांपासून इथे मतदान करतात. पण आत गेल्यावर कळलं की त्यांचं मतदान आधीच झालंय! त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर त्यांना पोस्टल बॅलेटने मतदान करू देण्यात आलं. या सगळ्या प्रकारावर रोहित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. “बोटावरची शाई पुसली जातेय, तशी लोकशाही पुसली जाऊ नये,” असा टोला त्यांनी लगावला. EVM क्रमवारी आणि मतदानाची आकडेवारी लपवली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही