Share

मुंबई-पुणेकर ‘फिस’, कोल्हापूरकर ‘सुसाट’; मतदानात कुणी मारली बाजी? आकडे बघून थक्क व्हाल!

मुंबईत ४१% तर पुण्यात ३६% मतदान; कोल्हापूरकरांचा उत्साह मात्र भारी. महापालिका निवडणुकीत कोणत्या शहरात किती मतदान झालं? वाचा सविस्तर आकडेवारी.

Published On: 

Mahapalika Election | Pune Bogus Voting

मुंबई – नऊ वर्षांच्या मोठ्या ‘गॅप’नंतर निवडणुका आल्या, पण मतदारांचा उत्साह मात्र कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. ज्या मुंबई-पुण्यावर संपूर्ण राज्याचं लक्ष असतं, तिथेच मतदानाचा आकडा बघून राजकीय पुढाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. सकाळपासून रांगा लागतील आणि विक्रमी मतदान होईल अशी चर्चा होती, पण दुपारच्या आकडेवारीने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.

सकाळपासूनच मतदानाची प्रक्रिया सुरू झाली, पण मुंबई आणि पुण्यात मतदारांनी निरुत्साह दाखवला. मुंबईत दुपारी ३.३० वाजेपर्यंत केवळ ४१.०८ टक्के मतदान झालं. त्याहून धक्कादायक म्हणजे पुण्याची स्थिती! विद्येचं माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यात Mahapalika Election साठीचा मतदानाचा टक्का अवघ्या ३६.९५ टक्क्यांवर रेंगाळला. मुंबईतील कुलाबा वॉर्ड २२७ मध्ये तर परिस्थिती अतिशय गंभीर आहे, तिथे फक्त १५.७३ टक्के लोकांनीच बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. हा कदाचित राज्यातील सर्वात निचांकी आकडा ठरू शकतो.

एकीकडे मुंबई-पुण्यात ‘थंडा कर के खाओ’ अशी गत असताना, दुसरीकडे कोल्हापूरकरांनी मात्र आपलं ‘भिडू’पण जपलंय. राज्यात कोल्हापूरने बाजी मारली असून तिथे दुपारी ३.३० पर्यंत ५०.८५ टक्के मतदान झालंय. कोल्हापूरच्या तांबड्या-पांढऱ्या रश्याचा झणझणीतपणा मतदानातही उतरल्याचं दिसतंय. परभणी आणि अहिल्यानगरमध्येही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

असं असलं तरी, शंभरी ओलांडलेल्या आजी-आजोबांनी आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या ‘झेन झी’ (Gen Z) पिढीने मात्र लोकशाहीचा उत्सव साजरा केला. सोलापुरात ५२ ते ५५ टक्क्यांपर्यंत मतदान जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे. आता ५.३० नंतरची अंतिम आकडेवारी आल्यावरच चित्र पूर्ण स्पष्ट होईल, पण दुपारपर्यंतच्या आकडेवारीने उमेदवारांची धाकधूक मात्र नक्कीच वाढवली आहे.

राज्यातील 29 महापालिकेमध्ये कुठं, किती मतदान?

  1. बृहन्मुंबई महानगरपालिका : 41.08 टक्के
  2. ठाणे : 43.96
  3. कल्याण डोंबिवली : 38.69
  4. नवी मुंबई- 45.51 टक्के
  5. उल्हासनगर : 34.88
  6. भिवंडी निझामपूर – 38.21
  7. मिरा भाईंदर : 38.34
  8. वसई विरार : 45.75
  9. पनवेल : 44.04
  10. नाशिक : 39.64
  11. मालेगाव : 46.18
  12. धुळे : 36.49
  13. जळगाव : 34.27
  14. अहिल्यानगर : 48.49
  15. पुणे – 36.95 टक्के
  16. पिंपरी चिंचवड – 40.50 टक्के
  17. सोलापूर : 40.39
  18. कोल्हापूर : 50.85
  19. सांगली मिरज-कुपवाड : 41.79
  20. छ. संभाजीनगर : 43.67
  21. नांदेड वाघाळा : 42.47
  22. लातूर : 43.58
  23. परभणी : 49.16
  24. अमरावती : 40.62
  25. अकोला : 43.35
  26. नागपूर : 41.23
  27. चंद्रपूर : 38.12
  28. इचलकरंजी : 46.23
  29. जालना : 45.94

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही