Share

“मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का?” महेश लांडगेंचा अजितदादांवर एकेरी वार; महायुतीत मोठी ठिणगी!

अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला भाजप आमदार महेश लांडगे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “आम्ही बांगड्या घातल्या नाहीत,” म्हणत लांडगेंनी अजितदादांवर एकेरी भाषेत टीका केली.

Published On: 

Mahesh Landge vs Ajit Pawar

पुणे – राजकारणात सत्तेसाठी एकत्र आलेले मित्र पक्ष कधी एकमेकांचे वैरी बनतील, हे सांगता येत नाही, याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्राला येतोय. सत्तेत एकाच ताटात जेवणारे भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आता एकमेकांचे वाभाडे काढायला लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये तर हा वाद विकोपाला गेला असून, भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर एकेरी भाषेत हल्लाबोल केल्याने खळबळ उडाली आहे.

BJP Mahesh Landge vs NCP Ajit Pawar 

झालं असं की, काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी “माझ्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला, पण आरोप करणारेच आता माझ्यासोबत सत्तेत बसलेत,” असा टोला लगावला होता. इतकंच नाही तर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात महेश लांडगे यांचा उल्लेख ‘भ्रष्टाचाराचा आका’ असा केल्याची चर्चा होती. नेमकी हीच गोष्ट लांडगे यांच्या जिव्हारी लागली आणि त्याचा भडका उडाला.

“आम्ही काय बांगड्या घातल्यात का?”

महेश लांडगे यांनी भरसभेत अजित पवारांना लक्ष्य केले. संतापलेल्या लांडगेंनी थेट दादांचा एकेरी उल्लेख करत सुनावले, “तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. आमच्या नादी लागू नको.” लांडगे इतक्यावरच थांबले नाहीत, तर आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली आहे, असा थेट इशाराच त्यांनी (Mahesh Landge) दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि त्यानंतर संबंधित नेते भाजपमध्ये आले, या जुन्या गोष्टीचा संदर्भ देत लांडगे यांनी अजितदादांना डिवचले. “आपले ‘देवा भाऊ’ (Devendra Fadnavis) शांत बसतात, पण जेव्हा ते इशारा देतात, तेव्हा इशारा समजला की ७० हजारांचा घोटाळा करणारे आणि घोटाळा काढणारे, सगळेच जमा होणार आहेत,” असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता महेश लांडगे यांनीही अजितदादांविरोधात दंड थोपटल्याने पुण्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही