Share

‘कपडे काढ अन् नाच…’; तनुश्री दत्ताचा सेटवरचा ‘तो’ भयंकर अनुभव, दिग्दर्शकाचा प्रताप उघड!

Actress Tanushree Dutta reveals a shocking incident where a director told her to “take off clothes and dance” on set during a shoot.

Published On: 

Actress Tanushree Dutta reveals a shocking incident where a director told her to "take off clothes and dance" on set during a shoot.

🕒 1 min read

मुंबई – चंदेरी दुनियेच्या झगमगाटामागे किती अंधार दडलाय, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. #MeToo मोहिमेद्वारे बॉलिवूडला हादरवून सोडणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) पुन्हा एकदा एका गंभीर आरोपामुळे चर्चेत आली आहे. नाना पाटेकरांनंतर आता तनुश्रीने एका प्रसिद्ध दिग्दर्शकावर तोफ डागली आहे. “कपडे काढ आणि नाच…” अशा शब्दांत त्या दिग्दर्शकाने आपली लायकी दाखवून दिल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट तनुश्रीने केला आहे.

Tanushree Dutta reveals a shocking incident

एका मुलाखतीत तनुश्रीने हा संतापजनक किस्सा शेअर केला. एका चित्रपटाच्या गाण्याचं शूटिंग सुरू होतं. सीन असा होता की, तनुश्रीला तिचा गाऊन काढून डान्स करायचा होता. पण दिग्दर्शकाने ज्या भाषेत तिला सूचना दिली, ते ऐकून सेटवर सर्वच अवाक झाले. तनुश्री सांगते, “तुला मुलींशी कसं बोलायचं हे कळत नाही का? तू कितीही मोठा दिग्दर्शक असलास तरी इतकं उद्धट का बोलतोयस?” यावर त्या दिग्दर्शकाने निर्लज्जपणे उत्तर दिलं, “कपडे काढ आणि नाच…”

“मी गप्प बसले नाही…” तनुश्री पुढे म्हणाली की, ही गोष्ट तो नीटही सांगू शकला असता, पण त्याची वागण्याची पद्धतच घाणेरडी होती. विशेष म्हणजे, त्या दिग्दर्शकाचं हे वागणं पाहून सेटवर उपस्थित इतर कलाकारांनाही वाईट वाटलं होतं. “एखादी अभिनेत्री किंवा मिस इंडियासोबत बोलण्याची ही पद्धत नाही,” असं म्हणत तनुश्रीने ( Tanushree Dutta ) त्यावेळी त्या दिग्दर्शकाला चांगलंच सुनावल्याचं सांगितलं.

कोण आहे तो दिग्दर्शक?

तनुश्रीने या प्रसंगानंतर माध्यमांसमोर येत याबाबत वाच्यता केली होती, पण तिने अजूनही त्या दिग्दर्शकाचं नाव उघड केलेलं नाही. त्याला मुलींशी वागण्याची अक्कल नाही, असं म्हणत तिने आपला संताप व्यक्त केला आहे. २०१८ मध्ये तनुश्रीने #MeToo अंतर्गत अनेक दिग्गजांची पोलखोल केली होती, त्यामुळे आता तिच्या या नव्या खुलाशामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही