Share

VIDEO- हायवेनंतर थेट मसनघाट! BJP नेत्याचे स्मशानभूमीत महिलेसोबत ‘कांड’

UP BJP leader caught half-naked with woman in crematorium car, video goes viral.

Published On: 

BJP leader caught with woman in crematorium, viral video shows him apologizing.

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर एका BJP नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर शारीरिक संबंध बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेली खळबळ अजून शांत झालेली नसतानाच, आता बुलंदशहरमधील शिकारपूर तालुक्यातून असाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री राहुल वाल्मिकी ( Rahul Valmiki ) एका विवाहित महिलेसोबत कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत आढळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. विशेष म्हणजे ही घटना स्मशानभूमी परिसरात घडली असल्याने संताप आणखी तीव्र झाला आहे. ११ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास कैलावान गावातील स्मशानभूमीजवळ एक संशयास्पद कार उभी असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं. जेव्हा त्यांनी कारजवळ जाऊन पाहिलं, तेव्हा राहुल वाल्मिकी एका विवाहित महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत आढळले.

BJP Leader Caught in Crematorium with Woman

व्हिडिओमध्ये राहुल वाल्मिकी केवळ अंतर्वस्त्रात कारमधून बाहेर येताना दिसतात. गर्दी पाहून त्याने लोकांना हात जोडून माफी मागण्यास सुरुवात केली. “माफ करा, व्हिडिओ काढू नका, जाऊ द्या,” असं विनवताना ते ( Rahul Valmiki ) दिसतात. महिलाही चेहरा पदराआड लपवत होती.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राहुल वाल्मिकी यांच्या वडिलांनी हा व्हिडिओ ५–६ महिन्यांपूर्वीचा असून, आता राजकीय हेतूने पुन्हा व्हायरल करण्यात आला आहे, असा दावा केला आहे. बुलंदशहरचे पोलीस अधीक्षक डॉ. तेजवीर सिंह यांनी सांगितलं की, “व्हिडिओची खातरजमा केली जात असून अद्याप कोणतीही तक्रार दाखल नाही, तपास सुरू आहे.”

या घटनेमुळे पुन्हा एकदा भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर चारित्र्य आणि नैतिकतेचे प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install