Share

चारच तासांत पाकिस्तानची बेईमानी; युद्धविराम तोडत गोळीबार, ड्रोन हल्ला

Just four hours after the ceasefire announcement, Pakistan violated the truce with firing in Rajouri and Baramulla and drone sightings in Jammu and Rajasthan.

Published On: 

After Ceasefire, Pakistan Leaders Continue Aggressive Rhetoric Against India;

मुंबई – भारत आणि पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामाची घोषणा केली होती. मात्र, ही शांततेची घोषणा फार काळ टिकली नाही. अवघ्या चार तासांतच पाकिस्तानने युद्धविराम तोडत राजौरी आणि बारामुल्ला येथे गोळीबार केला, तसेच जम्मू आणि राजस्थानमध्ये ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू शहरात तत्काळ ब्लॅकआउट करण्यात आले.

आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून युद्धविराम लागू झाल्याची घोषणा भारताने केली होती. ही घोषणा परराष्ट्र सचिवांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. पाकिस्तानच्या डीजीएमओचा भारताच्या डीजीएमओला दुपारी 3:15 ला फोन आला होता, त्यानंतर ही शस्त्रसंधी ठरवण्यात आली. मात्र चार तासांच्या आतच पाकिस्तानने याचे उल्लंघन केलं.

Pakistan Breaks Ceasefire in Just 4 Hours, Opens Fire in J&K and Sends Drones Over Jammu, Rajasthan

राजौरी आणि बारामुल्ला येथे गोळीबार झाला, श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले, तर जम्मू आणि राजस्थानमध्ये ड्रोन पुन्हा दिसल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने भारतीय लष्कराला कठोर प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. सीमारेषेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही