Share

९ दहशतवादी अड्ड्यांवर टार्गेटेड हल्ले, लष्कर-ए-तैयबाचे म्होरके ठार

India strikes 9 terrorist camps in Pakistan and PoK under Operation Sindoor, eliminating top Lashkar-e-Taiba leaders and destroying training hubs.

Published On: 

Operation Sindoor: India Destroys 9 Terror Camps in Pakistan, Kills Top Lashkar Commanders

भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक आणि टार्गेटेड हल्ले करत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. लष्कर-ए-तैयबाचे ६ प्रमुख दहशतवादी ठार झाले असून अनेक प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. ही माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

या मोहिमेत कोणत्याही सामान्य नागरिकाला इजा झाली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. भारताने केवळ दहशतवाद्यांच्या केंद्रांनाच लक्ष्य केलं असल्याचं लष्कराने ठामपणे सांगितलं.

Operation Sindoor: India Destroys 9 Terror Camps in Pakistan, Kills Top Lashkar Commanders

कर्नल कुरेशी यांनी रात्री 1:05 ते 1:30 या वेळेत हल्ले झाले असल्याचं सांगत त्याचे फुटेज माध्यमांसमोर सादर केले. पहलगाम हल्ल्यामागील मास्टरमाईंडचा खात्मा या कारवाईत करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या हल्ल्यात बहावलपूर, मुरीदके, कोटली, आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद गटाचं बालेकिल्ला असलेलं ठिकाण तर मुरीदकेमधील लष्कर-ए-तैयबाचा गड उद्ध्वस्त करण्यात आला आहे. अमजल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनी प्रशिक्षण घेतलेल्या अड्ड्यांवरही निशाणा साधला गेला असल्याची माहिती उघड झाली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही