Share

भारत-पाक तणाव शिगेला; या देशाने पाकिस्तानला पाठवला मोठा दारुगोळा आणि फायटर जेट्स

Turkistan becomes the first country to aid Pakistan with arms and fighter jets amid rising tensions with India.

Published On: 

Turkistan Sends Weapons, Fighter Jets to Pakistan; Azerbaijan Boosts Ties with India

Turkistan | काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याने कोणत्याही क्षणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने लष्करी मदतीसाठी विविध देशांकडे हात टेकला होता.

पाकिस्तानच्या मदतीला तुर्कस्तान सर्वप्रथम पुढे आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तुर्कस्तानच्या ए-130 मालवाहू विमानांनी मोठ्या प्रमाणात दारुगोळा पाकिस्तानात पोहोचवला आहे. यासोबतच लढाऊ विमाने देखील पाकिस्तानला देण्याची तयारी तुर्कस्तानने दर्शवली आहे. चीननेही पाकिस्तानच्या पाठीशी असल्याचे सूचक संकेत दिले आहेत, त्यामुळे युद्ध पेटल्यास पाकिस्तानला तुर्कस्तान आणि चीनकडून मोठी मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Turkistan Sends Weapons, Fighter Jets to Pakistan

दरम्यान, दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत पाकिस्तानविरोधात निर्णायक निर्णय घेतला जाऊ शकतो.

याचवेळी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्याचा जुना मित्र अझरबैजानने भारताशी मैत्रीचा हात वाढवला आहे. बाकू ते अहमदाबाद थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय अझरबैजानने घेतला असून, ही सेवा 4 जुलैपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून चार वेळा ही सेवा उपलब्ध राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही