Share

“साजिद खानने मला घरी बोलावलं आणि म्हणाला आता कपडे काढून..”, अभिनेत्री नवीनाचे गंभीर आरोप

Actress Navina Bole has accused director Sajid Khan of casting couch misconduct, revealing that he allegedly asked her to strip during a meeting at his house.

Published On: 

Navina Bole Accuses Sajid Khan of Casting Couch Misconduct | Shocking Revelation

🕒 1 min read

मुंबई | २८ एप्रिल: ‘इश्कबाज’ आणि ‘मिले जब हम तुम’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री नवीना बोलेने दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप करत कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव उघड केला आहे. एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत नवीनाने हा संपूर्ण प्रकार सांगितला.

नवीना बोलेने सांगितले की, साजिद खानने तिला घरी बोलावून कपडे काढण्यास सांगितले होते. “तो मला म्हणाला होता, तुझे सर्व कपडे काढ आणि अंतर्वस्त्रांमध्ये येऊन बस, मला पाहायचं आहे की तू किती कम्फर्टेबल आहेस,” असं नवीना म्हणाली. हा प्रकार २००४ ते २००६ दरम्यान घडल्याचं तिने स्पष्ट केलं.

Navina Bole Accuses Sajid Khan of Casting Couch Misconduct

नवीना पुढे म्हणाली की, ती त्याच्याकडे कामाच्या आशेने गेली होती, मात्र तिथे तिला अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली. “मी तिथून कशीबशी निघाले. त्यानंतर साजिदने मला अनेक वेळा फोन करून भेटायला बोलावले,” असा आरोपही नवीनाने केला.

याआधी २०१८ मध्येही साजिद खानवर अनेक अभिनेत्रींनी #MeToo मोहिमेदरम्यान आरोप केले होते. त्यानंतर त्याला काही प्रकरणांमध्ये क्लिन चिट मिळाली होती. मात्र नवीना बोलेच्या नव्या खुलास्यामुळे साजिद खानवर पुन्हा एकदा वादंग उठण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही